पालकमंत्री व सभापतीच्या गाडीला एकाच दिवशी अपघात

0
13

गोंदिया-राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या गाडीला त्यांच्याच ताप्यातील वाहनाने मागून धडक दिली.यामद्ये पालकमंत्र्यांना किरकोळ जखम झाली.त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारानंतर लगेच सुट्टी देण्यात आली.ही घटना सायकांळी 3 ते 5 वाजेदरम्यान घडली.त्याचदरम्यान मात्र कोहमारा कोकणा मार्गावर सडक अर्जुनी पंचायत समितीच्या सभापती कविता रंगारी यांच्याही वाहनाला कोहमारनजीक पुलाजवल हा अपघात झाला. एका कार्यक्रमासाठि जात होत्या.यावेळी पुढचा टायर फाटल्याने सदर वाहन ट्रक्टरला भिडले. विशेष म्हणजे दोन्ही अपघात हे बौध्द पोर्णिमेच्या एकाच दिवशी झाल्याने सडक अर्जुनी तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.याआधी एकदा पालकमंत्री आमदार असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला होता.