चंद्रपूरच्या हिवताप कर्मचाऱ्याविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा दाखल

0
9

चंद्रपूर- जिल्हा हिवाताप अधिकारी कार्यालयात आरोग्य हिवताप कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याविरोधात चंद्रपूर पोलिस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीचे नाव शंकर मोडकू मेश्राम असे आहे.
सविस्तर असे की, आरोपी विरुद्ध लाचलुपत विभागाचला आरोपीने आपल्या लोकसेवक पदाचा दुरुपयोग करून अपसंपदा गोळा केल्याविषयी तक्रार प्राप्त झाली होती. त्यामुळे लाचलुचपत विभागाने आरोपी शंकर विरुद्ध चौकशी करून त्याने वैध उत्पन्नाशिवाय 6 लाख 61 हजार 70 रुपयांची अपसंपदा गोळा केल्याचे आढळून आल्याने त्याचे विरुद्ध
काल (ता.14) रोजी चंद्रपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.