५ रुपये ५० पैसे वीज दरवाढ प्रस्तावित

0
9

गोंदिया,दि. 14 – महसुली तूट वाढत असल्याचे कारण सांगत महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीने ५ रुपये ५० पैसे प्रति युनिट वीज दरवाढीचा प्रस्ताव नियामक आयोगाला सादर केला आहे. त्यावर आता प्रत्येक महसूल विभागात जनसुनावणी घेतली जाणार आहे.

वीज महावितरणने वीज दरवाढीची प्रस्तावित केलेली याचिका (क्र.४८/२०१६) नियामक आयोगाने १० जून रोजी दाखल करून घेतली आहे. महावितरणने सन २०१६-१७ ते २०१९-२० या काळातील प्रस्तावित दरवाढ सादर केली आहे. त्यासाठी महसुली तूट ५६ हजार ३७२ कोटी रुपयांवर पोहोचणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे