नरसिंगचा कुक म्हणाला, भेसळ करणा-याला मी ओळखू शकतो!

0
8

वृत्तसंस्था
नवी दिल्ली,दि.27- पहिलवान नरसिंग यादवच्या डोपिंग प्रकरणात मोठा गौप्यस्फोट झाला आहे. त्याच्यासाठी जेवण बनवणाऱ्या चंदनने सांगितले की, जूनला मी नरसिंगसाठी भाजी बनवत होतो. टोमॅटो आणण्यासाठी मी स्टोअरमध्ये गेलो. इतक्यात ज्युनियर कॅम्पमधील एक मुलगा नरसिंगच्या भाजीत काहीतरी मिसळत होता. तो कोण असल्याची विचारणा मी मेसवाल्यांना केली. मात्र, कुणीच काही उत्तर दिले नाही. दुसरीकडे, भाजीला फेस येत असल्याचे दिसले. याची माहिती दिल्यानंतर नरसिंगने भाजी फेकून दिली. मात्र, या घटनेच्या आधी आणि नंतर असा प्रकार घडला होता की नाही, याची मला माहिती नाही.
नरसिंगने मल्ल सुशीलकुमारचे प्रशिक्षक तथा सासरे सत्पाल यांच्यावर थेट आरोप केले आहेत. नरसिंग म्हणाला, पंतप्रधानांनी हस्तक्षेप केल्यानंतरही आतापर्यंत साईचा अधिकारी वा तपास संस्थेने माझ्याशी संपर्क साधलेला नाही. आता मी, माझा रूम पार्टनर संदीप तुलसी माझे प्रशिक्षक मिळून आमच्या पातळीवर साक्षी-पुरावे गोळा करत आहोत. नरसिंग म्हणाला, आठवडाभरापूर्वीच डोपिंग चाचणीचा निकाल माहीत होता, असे सत्पाल म्हणत होते. याचा अर्थ सुनियोजित कटानुसारच हे सर्व घडले. त्यात साईच्या महिला अधिकाऱ्याचाही सहभाग असल्याचे वाटते.