पुर्व विदर्भात ओबीसींच्या मागण्यांना घेऊन शाळा,महाविद्यालये बंद

0
11

obc 2ओबीसी शेतकरी, विद्याथ्र्यांना न्याय द्या : सालेकसात विशाल
गोंदिया, दि. २७ : ओबीसी विद्यार्थी, शेतकरी आणि तळागाळातील लोकांना शासनाने न्याय्य द्यावा, त्यांचे प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवावेत, याकरिता पुर्व विदर्भातील नागपूर, गोंदिाया,भंडारा,चंद्रपूर,गडचिरोली व वर्धा जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालये बुधवारी (दि. २७) बंद ठेवण्यात आली. राष्ट्रीय ओबीसी महासंघ महात्मा फुले समता परिषद, ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवा संघ,ओबीसी कृती समितीच्या बॅ्नरखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा एक भाग म्हणून सालेकसा येथे विद्यार्थी- विद्यार्थिनींनी विशाल मोर्चा काढत शासन, प्रशासनाचे लक्ष वेधले.
ओबीसींचे घटनादत्त अधिकार आणि विविध आयोगांच्या शिङ्कारशी असतानासुद्धा सरकार पूर्तता करण्यास सपशेल अयशस्वी ठरले आहे. ओबीसींचा केवळ राजकारणाकरिता वापर केला जात आहे. खèया अर्थाने मात्र, त्यांना सोयी- सवलती आणि हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. हे कदापि, खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला.
दरम्यान, भारत सरकारची मट्रीकोत्तर शिष्यवृत्ती १०० टक्के देण्यात यावी, नॉन क्रिमिलिअरची असंवैधानिक जाचक अट रद्द करावी, ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना जाहीर करावी, राज्य व केंद्रात ओबीसींच्या संख्येच्या आधारावर बजेट प्रावधान करून स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, केंद्र व राज्य सरकारकडे थकीत असलेली ओबीसी विद्याथ्र्यांची शिष्यवृत्ती त्वरित अदा करावी, ओबीसी विद्याथ्र्यांना उच्च शिक्षणाकरिता शंभर टक्के शिष्यवृत्ती द्यावी, जात पडताळणीकरिता ओबीसी संवर्गातील अधिकाèयांचीच नियुक्ती करावी, प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर ओबीसी विद्याथ्र्यांसाठी शासकीय वसतिगृह द्यावे, एससी- एसटीप्र‘ाणे ओबीसी विद्यार्थी आणि शेतकèयांना शंभर टक्के सवलतींवर केंद्र व राज्य शासनाच्या योजना लागू कराव्यात, ओबीसी कर्‘चाèयांना पदोन्नतीने आरक्षण देण्यात यावे आदी मागण्यांकरिता शाळा- ‘हाविद्यालये बंद ठेवण्यात आली. गोंदिया शिक्षण संस्थेने या आंदोलनाला पाठिंबा देत, शिक्षण संस्थेची सर्व शाळा-म‘हाविद्यालये बंद ठेवली होती.chan obc
गोंदिया येथे खेमेंद्र कटरे,राजेश नागरीकर,बंशीधर शहारे,चंद्रकुमार बहेकार, सालेकसा येथे बबलू कटरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.साखरीटोला येथे प्रा.सागर काटेखाये,रमेश चुटे,डाॅ.संजय देशमुख,मनोज शरणागत,शामलाल दोनोडे,प.स.सदस्या सुनंदा बहेकार,कठाणे ताई यांनी नायब तहसिलदारांना निवेदन दिले.
आमगाव तालुक्यातील सर्व शाळा बंद करुन तहसिलादांना निवेदन देण्यात आले.यावेळी लीलाधर गिर्हेपुंजे,हरिष ब्राम्हणकर,सावन कटरे,विनायक येडेवार,तिरथ येटरे,जयकृष्ण रहागंडाले,कृष्णा बहेकार,राधाकिसन चुटे,मुकेश पडोळे,तेजस वैरागडे आदींनी निवेदन दिले.
येथे विद्यार्थी- विद्यार्थिनींनी विशाल मोर्चा काढून मागण्यांकडे लक्ष वेधले. गोंदिया शहर व तालुका, देवरी, अर्जुनी मोरगाव, गोरेगाव, सडक अर्जुनी, तिरोडा, आ‘गाव आदी तालुक्यांतही बंदला उत्ङ्कूर्त प्रतिसाद मिळाला. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर,हिंगणघाट,भंडारा जिल्ह्यातही शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली.चंद्रपूर जिल्हायत ओबीसी कृती समितीच्यावतीने सयोंजक सचिन राजुरकर यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले.यावेळी बबनराव फंड,बबनराव वानखेडे,संजय गावडे,रामभाऊ कुमरे,राजेंद्र शिरभाते,अनंत वैरागडे,एस.एस.निकुंभे,ज.वा.जुनघरी आदी उपस्थित होते.