विश्वविक्रमासह देवेंद्रने पटकाविले दुसऱ्यांदा सुवर्ण

0
10
वृत्तसंस्था
रिओ दि जानिरो – रिओ पॅरालिंपिकमध्ये देवेंद्र झांझरियाने भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून देण्याची कामगिरी केली आहे. देवेंद्रने भालाफेकमध्ये 63.97 मीटर भालाफेक करत विश्वविक्रम नोंदविला. देवेंद्रच्या या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातून कौतुक करण्यात येत आहे. पॅरालिंपिक स्पर्धांतील देवेंद्रचे हे दुसरे सुवर्णपदक आहे.
 
ऑलिंपिकमध्ये एकही सुवर्णपदक मिळविण्यात अपयशी ठरलेल्या भारताला पॅरालिंपिकमध्ये मात्र दुसरे सुवर्णपदक मिळाले आहे. रिओ पॅरालिंपिकमध्ये आतापर्यंत भारताला दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक ब्राँझपदक मिळाले आहे. डाव्या हाताने अपंग असलेल्या 36 वर्षीय देवेंद्रला केंद्र सरकारकडून 2004 मध्ये अर्जुन आणि 2012 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. हे पुरस्कार मिळविणारा हा पहिला पॅरालिंपियन खेळाडू आहे.