जिल्ह्यात सरासरी ९५६.७ मि.मी.पाऊस

0
11

गोंदिया,दि.१४ : जिल्ह्यात १ जून ते १४ सप्टेबर २०१६ या कालावधीत ३१५७२.५ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ९५६.७ मि.मी. इतकी आहे. आज १४ सप्टेबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ५४६.४ मि.मी. इतका पाऊस पडला असून त्याची सरासरी १६.५ मि.मी. इतकी आहे. आजपावेतो जिल्ह्यात ७९ टक्के पाऊस झाला आहे. १४ सप्टेबर रोजी सकाळी ८ वाजता पर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढील प्रमाणे असून त्याची सरासरी कंसात दर्शविण्यात आली आहे. गोंदिया तालुका- २५४ मि.मी. (३६.३), गोरेगाव तालुका- १६.२ मि.मी. (५.४), तिरोडा तालुका- ११३.४ मि.मी. (२२.७), अर्जुनी मोरगाव तालुका- ५५ मि.मी. (११.०), देवरी तालुका- ३७.४ मि.मी. (१२.५), आमगाव तालुका- ४३.४ मि.मी. (१०.८), सालेकसा तालुका- २७ मि.मी. (९.०) आणि सडक अर्जुनी तालुका- निरंक, असा एकूण ५४६.४ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी १६.५ मि.मी. इतकी आहे.