नक्षलग्रस्त देवरी तालुक्यात महिला कबड्डी स्पर्धेला प्रतिसाद

0
32

गोंदिया,दि.31- गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त देवरी तालुक्यातील पुराडा येथे पुर्व विदर्भस्तरीय भव्य अशा महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेमध्ये पुर्व विदर्भातील पाच जिल्ह्यातून 25 ते 50 वयोगटातील महिलांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.या स्पर्धेचे उदघाटन आमदार संजय पुराम,माजी सभापती सविता पुराम यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कधी काळी ग्रामीण भागातील महिला ह्या “चूल आणि मुलं” पर्यंत मर्यादित राहत होत्या मात्र आता त्यांचा सुप्त गुणांना वाव मिळत असून आता महिला त्या थेट मैदानात उतरल्या आहे.गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम तसेच नक्षलग्रस्त आदिवासी बहुल “पुराडा” या गावाला सध्याचा घडीला सुगीचे दिवस आलेले आहेत .ऐकनू जरी आश्चर्य वाटले असेल मात्र या आदिवासी गावात होणाऱ्या महिलांचा कबड्डी स्पर्धेमुळे या गावात विविध जिल्ह्यातून आलेल्या महिला खेळाडूंमुळे गावात उत्साहाचे वातावरण आहे .गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यांतर्गत येणाऱ्या पुराडा या गावात गेल्या चार वर्षांपासून राणी दुर्गावती क्रीडा मंडळातर्फे विवाहित महिलांच्या भव्य महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करत आहे.यामध्ये भंडारा , गोंदिया ,चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यातील महिला कबड्डी चमू सहभागी होतात.या महिला कबड्डी स्पर्धेला पाहण्याकरिता मोठ्या प्रमाणात गावकरी एकत्रित येत असून यामध्ये पुरुषांचा देखील समावेश अाहे.तर कधी काळी ग्रामीण भागातील महिला फक्त चूल तसेच मुलं पर्यंत मर्यादित असेलेल्या या महिला कबड्डी ,कबड्डी करीत संपूर्ण पटांगणाचा पाटी हालवतात.या दरम्यान गावात खेळाडू वृत्तीचे वातावरण निर्माण होते,तर ग्रामीण भागातील महिलांचा सुप्त गुणांना वाव मिळावा व त्यांचा खेळाडू वृत्ती जिवंत राहावी या दृष्टिकोनातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते असे आयोजकांचे म्हणने आहे.तीन दिवसीय चालणाऱ्या या स्पर्धे दरम्यान महिलांना देवरी विधान सभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.