महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद

0
8

चंद्रपूर दि.9: नागपूर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन ३ ते ५ मार्च या कालावधीत वर्धा येथे पार पडले. या स्पर्धेत नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया व भंडारा या जिल्ह्यांचा तसेच नागपूर आयुक्त कार्यालयातील खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले. या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले.स्पर्धेत विविध खेळाचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर जिल्ह्याच्या चमूने कबड्डी, खो-खो, महिला थ्रो-बॉल याप्रमाणे सांघिक खेळात उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करीत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. तसेच बॅटमिटन, जलतरण, धावणे, लांब उडी, उंच उडी या वैयक्तिक खेळात सुध्दा अनुक्रमे सुभाष बोड्डावार, निकिता रामटेके, सुनंदा चौधरी, प्रविण गुज्जनवार, मारोती पुनवटकर, पोर्णिमा नैताम, वैशाली कामडी इत्यादी स्पर्धकांनी उत्कृष्ट करीत पदक पटकाविले.
सांस्कृतिक स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याने सांघिक विजतेपद पटकाविले. तसेच कला प्रकारात आॅनलाईन सातबारा या नाटकास उत्कृष्ट नाटिका तसेच प्रमोद अडबाले व मंदा हेपट यांना उत्कृष्ट कलाकार म्हणून पुरस्कार प्राप्त झाले. उत्कृष्ट नाटीका दिग्दर्शन व लेखनाचा पुरस्कार राजेश कावळे यांना देण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरोऱ्याचे उपविभागीय अधिकारी प्रमोद भूसारी, कोरपना तहसिलदार पुष्पलता कुमरे, राजु धांडे व शरद मसराम यांनी विशेष परिश्रम घेतले.स्पर्धेतील यशस्वी सहभाग व नियोजनासाठी चंद्रपूरचे निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, चंद्रपूरचे तहसिलदार आशिष वानखेडे, नायब तहसिलदार कांचन जगताप, शैलेंद्र धात्रक, अमोल आखाडे तसेच अजय गाडगे यांनी सहकार्य केले. स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी विजयी चमुचे कौतुक केले आहे.