भारताचा वेस्ट इंडिजमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय

0
8
पोर्ट ऑफ स्पेन(वृत्तसंस्था)- भारताने पाच सामन्याच्या वन डे मालिकेतील दुस-या सामन्यात वेस्ट इंडिजचा 105 धावांनी पराभव केला. धावांनुसार कॅरेबियन भूमीवर भारताने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. या आधी भारताचा सर्वात मोठा विजय 102 धावांचा होता जो जुलै 2013 मध्ये मिळवला होता. रविवारी झालेल्या या सामन्यात इंडियन क्रिकेटर्सनी सर्वच आघाड्यावर विंडिजच्या अनुभव नसलेल्या टीमवर वर्चस्व राखले. भारताने हा सामना सहज खिशात टाकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.पहिल्या सामन्याप्रमाणेच दुस-या वन डे दरम्यानही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामन्याला उशिरा सुरुवात करण्यात आली होती.यामुळे षटकांमध्येही कपात करण्याचा निर्णय घ्यावा लागला, त्यामुळे हा सामना प्रत्येकी 43 षटकांचा खेळवण्यात आला.यजमान वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार जेसन होल्डरचा हा निर्णय टीम इंडियाच्या सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि शिखर धवनने साफ चुकीचा ठरवला.या जोडीने धडाकेबाज फलंदाजी करताना यजमानांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. त्यामुळे टीम इंडियाच्या धावसंख्येचा आलेख उंचावत राहिला.टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज अजिंक्य रहाणेने रविवारी यजमान विंडीजविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये शानदार शतक ठोकले. त्याने झंझावाती 103 धावांची खेळी केली.रहाणेने तुफानी फटकेबाजी करत त्याने आपल्या करिअरमधील तिसरे शतक ठोकले. त्याने १०४ चेंडूंचा सामना करताना दहा चौकारांसह दोन उत्तुंग षटकार ठोकून 103 धावांची खेळी केली.
टीम इंडियाची दमदार फलंदाजी-
 अजिंक्यसोबतच टीम इंडियाचा दुसरा सलामीवीर शिखर धवन (63), कर्णधार विराट कोहली (87) यांनी तुफानी खेळी केली. त्यामुळे भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 43 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 310 धावा काढल्या.
– भारताकडून सलामीवीर रहाणे आणि शिखर धवन ही जोडी पुन्हा चमकली. त्यांनी शानदार फलंदाजी करताना टीम इंडियाला शतकी भागीदारीची सलामी दिली. त्यांनी पहिल्या गड्यासाठी 114 धावांची भागीदारी रचली.
– धवनने या मालिकेमध्ये सलग दुसरे अर्धशतक ठोकले. त्याने दुसऱ्या वनडेमध्ये 63 धावांची खेळी केली. कोहलीने 66 चेंडूंमध्ये प्रत्येकी चार चौकार आणि चार षटकार ठोकून ८७ धावांची खेळी केली.
– टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज युवराज सिंग (14) फारसी छाप पाडू शकला नाही.
– धोनी (१३) आणि केदार जाधव (१३) नाबाद राहिले.
वेस्ट इंडिजकडून अल्जारी जोसेफेने 2 तर जेसन होल्डर, अॅश्ले नर्स आणि मिगुल कमिन्सने 1-1 विकेट घेतली.
इंडिजकडून शाई होप चमकला-
– 43 षटकात भल्यामोठ्या 311 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नवखी टीम असलेल्या इंडिजचा डाव गडगडला.
– वेस्ट इंडिज टीम 43 षटकात 6 बाद 205 धावाच करू शकली.
– यजमान टीमकडून शाई होपने सर्वाधिक 81 धावा केल्या. तर, रोस्टन चेजने नाबाद 33 आणि जेसन होल्डरने 29 धावा केल्या.
– मॅचमध्ये शानदार शतक ठोकलेल्या अजिंक्य रहाणेंला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले.