अश्विनचा नवा विक्रम, 36 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला!

0
7
India's Ravichandran Ashwin bowls against West Indies during day one of their second cricket Test match at the Sabina Park Cricket Ground in Kingston, Jamaica, Saturday, July 30, 2016. Ashwin took five wickets in (AP Photo/Ricardo Mazalan)

नागपूर,दि.27: नागपूर कसोटीत टीम इंडियाने श्रीलंकेवर एक डाव आणि 239 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या कसोटीत टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विननं 63 धावांत चार विकेट्स काढून श्रीलंकेचा दुसरा डाव गुंडाळण्यात प्रमुख भूमिका बजावली.क्रिकेट इतिहासात आर अश्विनने असा विक्रम केला आहे, ज्याचा सर्व भारतीयांना अभिमान आहे.अश्विनने कसोटी विकेट्सचे त्रिशतक साजरे केले, शिवाय सर्वात जलद 300 विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणून त्याची नोंद झाली आहे.अश्विनने 54 कसोटी सामन्यांमध्येच तीनशे विकेट्स घेऊन डेनिस लिलीचा 56 कसोटी सामन्यांचा विक्रम मोडीत काढला.ऑस्ट्रेलियाचे महान गोलंदाज लिली यांनी 1981 मध्ये 56 कसोटी सामन्यात 300 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर 36 वर्षांनी अश्विनने हा विक्रम मोडला आहे.इतकेच नाही तर अश्विनने हा विक्रम करताना 300 विकेट्स घेणाऱ्या भल्याभल्यांना मागे टाकलं आहे. यामध्ये श्रीलंकेचा मुथैय्या मुरलीधरन (58 कसोटी), रिचर्ड हेडली, माल्कम मार्शल आणि डेल स्टेन (61 कसोटी) यांचा समावेश आहे.दरम्यान, कसोटीमध्ये 300 विकेट्स घेणारा अश्विन हा पाचवा गोलंदाज ठरला आहे.अश्विनच्या पुढे अनिल कुंबळे (619), कपिल देव (434), हरभजन सिंह (417) आणि झहीर खान (311) हे गोलंदाज आहेत.