फुलचूरवासियांना काढला दारुबंदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0
7

गोंदिया,दि.२७-शहराला लागून असलेल्या व जिल्हाधिकारी,जिल्हापरिषद,पोलिस अधिक्षक कार्यालयासह समाजकल्याण कार्यालय असलेल्या फूलचूर ग्रामपंचायतीच्यावतीने आज सोमवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून गावात संपुर्ण दारुबंदीची मागणी करण्यात आली.ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आलेल्या निवदेनामध्ये फुलचूरच्या परिसरात मोठ्याप्रमाणात अवैधरित्या दारु विक्रीचा व्यवसाय सुरु असल्याने गावातील तरुण व्यसनाच्या आहारी जात आहेत.त्यातच सायकांळ व रात्रीच्यावेळी या व्यसनाधिनामुळे महिलासंह शाळकरी विद्याथ्र्यींनीना त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे गावातील या सर्व अवैध धंद्यावर आळा घालून गावात संपुर्ण दारुबंदी करण्याचा ठराव आज २७ नोव्हेंबरला आयोजित विशेष महिला ग्रामसभेत घेण्यात आला.तसेच ग्रामसभेला उपस्थित सर्व महिलांनी ग्रामसभा आटोपल्यानंतर सरळ जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकारी,पोलिस अधिक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन सादर केले.ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरिक्षक दिनेश शुक्ला यांनी मोर्चेकèयाचे निवेदन स्विकारले. या मोच्र्याचे नेतृत्व माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश चतूर,पंचायत समितीच्या माजी सभापती स्नेहा गौतम ,सरंपच,उपसरंच आशा मेश्राम,सत्यभामा कवास,उर्मिला रहमतकर,सुनिता बघेले,राणी बैस,मिना देवगडे,लता बैस,शिशुला नेवारे तमुस अध्यक्ष शिवनारायण नागपूरे,सुभानराव रहागंडाले,दिनेश गौतम,अशोक चन्ने,कल्पना कुंभरे,रुपाली अंबुले,ज्योती किरणापुरे,सुनिता सव्वालाखे व सर्व ग्रामपंचायत सदस्यानी केले.