पहिल्यांदाच विदर्भाने जिंकला रणजी करंडक

0
7

इंदूर,दि.०१–विदर्भ संघाने अंतिम सामन्यात बलाढ्य दिल्लीचा 9 विकेटने धुव्वा उडवत रणजी करंडकावर प्रथमच आपले नाव कोरले आहे. विदर्भाला दुसऱ्या डावात विजयासाठी 29 धावा आवश्यक होत्या. हे लक्ष्य एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण करत इंदूरच्या होळकर स्टेडियमवर विदर्भवीरांनी नवा इतिहास रचला.

विदर्भाने दिल्लीला पहिल्या डावात 295 आणि दुसऱ्या डावात 280 धावात रोखले. विदर्भाने पहिल्या डावात 547 धावांचा डोंगर उभा केला होता. दुसऱ्या डावात विदर्भान एका गड्याच्या मोबदल्यात विजय मिळवला. कर्नाटकसारख्या आठवेळा विजेता राहिलेल्या संघाला उपांत्य सामन्यात पराभूत करून थेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश, ही कामगिरी एकदम झळाळून उठते! अंतिम सामन्यात दिल्लीसंघाचा पराभव करत रणजी चषकाच्या इतिहासात आपले नाव कोरले आहे.

विदर्भाने पहिल्या डावात दिल्लीला 295 धावांवर रोखले. त्यानंतर कर्णधार फैज फजल 67, वसीम जाफर 78, अक्षय वखरे 17, अक्षय वाडकर 133, आदित्य सरवटे ७९, सिद्धेश नेरळ खेळत आहे 74 यांच्या खेळीच्या बळावर पहिल्या डावांत 547 धावांचा डोंगर उभा केला. दमदार फलंदाजीच्या जोरावर पहिल्या डावात विदर्भाने 252 धावांची आघाडी घेतली. विदर्भाने दुसऱ्या डावात दिल्लीला 280 धावांवर रोखले.

आपल्या पहिल्या मोसमात पाचव्या सामन्यात खेळणारा यष्टिरक्षक वाडकर 133 धावांच्या बळावर सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती. विदर्भाने तिसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात 7 बाद 528 धावांची दमदार मजल मारली. सिद्धेश नेरळ 92 चेंडूंना सामोरे जाताना 56 धावा काढून वाडकरला साथ देत आहे. त्याने अर्धशतकी खेळीत चार षटकार व चार चौकार लगावले. वाडकर व नेरळ यांनी आठव्या विकेटसाठी आतापर्यंत 113 धावांची अभेद्य भागीदारी केली आहे. दिल्लीचा पहिला डाव 295 धावांत संपुष्टात आला. वाडकरने त्याआधी होळकर स्टेडियममध्ये आदित्य सरवटेसोबत सातव्या विकेटसाठी 169 धावांची भागीदारी केली. सवरटेने 154 चेंडूंना सामोरे जाताना 79 धावा केल्या. विदर्भाने दुसऱ्या दिवसाच्या 4 बाद 206 धावसंख्येवरून पुढे खेळताना तिसऱ्या दिवशी निर्धाराने फलंदाजी केली. विदर्भाने दिल्लीच्या सुमार क्षेत्ररक्षणाचा लाभ घेतला. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतकडे विदर्भाच्या फलंदाजांना रोखण्याची कुठली रणनीती नव्हती. त्याने यष्टिचितची संधीही गमावली. याआधी विदर्भाने दोनदा उपांत्य फेरी गाठली होती. 2002-03 आणि 2011-12या सत्रात दोनदा विदर्भ संघ उपांत्य फेरीत पोहोचला; पण स्पर्धा जिंकू शकला नव्हता. याशिवाय संघाने दोनदा उपांत्यपूर्व फेरीतही धडक दिली होती.