ग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्षपदी कमलेश बिसेन बिनविरोध

0
25

गोंदिया,दि.०१ः- गोंदिया जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या मयूर लाॅन येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय अधिवेशनात गोंदिया जिल्हा ग्रामसेवक संघटनेची नवी कार्यकारीणी गठित करण्याकरीता विद्यमान जिल्हाध्यक्ष कार्तिक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 31 डिसेंबरला निवडणूक घेण्यात आली.या निवडणूकीत विद्यमान कार्याध्यक्ष कमलेश बिसेन यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत जिल्हाध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी मोठी जबाबदारी आपण दिली असून ग्रामसेवक संवर्गावर होणाऱ्या अनयाविरोधात लढा देण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली असून मी प्रामाणिकपणे निर्वाह करण्याचा संकल्प घेत असल्याचे विचार नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांनी व्यक्त केले. कमलेश बिसेन राज्यात विभागीय सचिव या पदावर कार्यरत आहेत हे विशेष.
‌निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मानद अध्यक्ष कार्तिक चव्हाण यांच्या नियंत्रणात पुढीलप्रमाणे कार्यकारिणी गठीत करण्यात आली.यामध्ये अध्यक्ष कमलेश बिसेन,सचिव दयानंद फटींग,उपाध्यक्ष सचिन कुथे,महिला उपाध्यक्ष कविता बागडे,कोषाध्यक्ष एल आर ठाकरे,सहसचिव सुनील पटले,राज्य कौंसिलर सुरेश वाघमारे,ओ.के.रहांगडाले,सुषमा वाढई, जिल्हा संघटक सुभाष सिरसाम,परमेश्वर नेवारे, रामा जमईवार,कायदे सल्लागार योगेश रुद्रकार, पांडुरंग हरिनखेडे  व धर्मेंद्र पारधी यांची dcps जिल्हा निमंत्रण म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. सभेचे संचालन प्रदीप ठाकरे यांनी केले व आभार छत्रपती काटगाये यांनी मानले.