कबड्डी स्पर्धेचे आ.पुराम यांच्या हस्ते बक्षिस वितरण

0
7

देवरी,दि.12ः- तालुक्यातील  पुराडा येथे आयोजित महिला कबड्डी स्पर्धेचे पुरस्कार वितरण आमदार संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेऴी भाजप महामंत्री विरेंद्र अंजनकर,भाजपा तालुकाध्यक्ष प्रमोद संगिडवार,प.स.सदस्य कोराम,माजी सभापती सविताताई पुराम, माजी सभापती मनोरमाबाई आचले,भरत चुटे ई मान्यवर उपस्थित होते. पुराडा येथे आयोजित महिला कबड्डी स्पर्धेत पहिले बक्षीस फुटाना येथील कबड्डी संघाने पटकावले.दुसरे बक्षीस सुध्दा पुराडा येथील महिलांनीच पटकावले.तर तृतीय क्रमांक बघेडा व चतुर्थ क्रमांक पाऊलदौना येथील महिला संघानी पटकाविला.महिला कबड्डी स्पर्धेत सहभागी व विजेत्या चमुचे कौतुक करून प्रोत्साहन राशीचे वितरण करण्यात आले.