हत्तीरोग दूरीकरण मोहीम यशस्वी करा-आमदार गोपालदास अग्रवाल

0
16

गोंदिया,दि.१२ : जिल्ह्यातील ग्रामीण भागात १० ते १२ फेब्रुवारी आणि शहरी भागात १० ते १४ फेब्रुवारी २०१८ दरम्यान हत्तीरोग दूरीकरणासाठी डीईसी व अल्बेंडाझोल गोळ्यांची सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येत आहे. ही हत्तीरोग दूरीकरण मोहीम सर्वांनी सहकार्य करुन यशस्वी करा. असे आवाहन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र दासगाव अंतर्गत लहीटोला येथील आरोग्य उपकेंद्र इमारतीचे लोकार्पण प्रसंगी आरोग्य उपकेंद्र पांढराबोडी येथील कर्मचारी श्री.बांगर यांना डिईसी व अल्बेंडाझॉल औषधाच्या गोळ्या सेवन करवून जिल्हास्तरीय हत्तीरोग दूरीकरण मोहिमेचा शुभारंभ आमदार अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जि.प.सभापती श्री.अंबुले, श्रीमती लता दोनोडे, श्रीमती शैलजा सोनवणे, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.खोडनकर, सरपंच दिनेश तुरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत समाजातील हत्तीरोग जंतूभार कमी करणे व हत्तीरोगाचा प्रसार थांबविणे. हायड्रोसील व हत्तीपाय रुग्णांना विकृतीपासून दूर ठेवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही मोहिम यशस्वी करण्यात येणार आहे.