अनिल कुंबळेचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश

0
9

वृत्तसंस्था
दुबई – भारताचा माजी फिरकीपटू याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ‘हॉल ऑफ फेम‘ यादीत समावेश करण्यात येणार आहे. या मानाच्या यादीत समावेश होणारा कुंबळे हा जगातील 77 वा खेळाडू आहे.

विश्वकरंडक स्पर्धेत रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. त्यावेळी कुंबळेचा या यादीत समावेश करण्यात येणार असल्याचे, आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कुंबळे हा सध्या आयसीसीच्या क्रिकेट समितीचा अध्यक्ष आहे. ‘हॉल ऑफ फेम‘मध्ये समावेश होणारा कुंबळे हा चौथा भारतीय क्रिकेटपटू आहे. यापूर्वी बिशनसिंह बेदी, कपिल देव आणि सुनील गावसकर यांचा यादीत समावेश आहे.

आयसीसीने कुंबळे याच्यासह बेटी विल्सन या महान महिला क्रिकेटपटूचाही या यादीत 78 वा खेळाडू समावेश केला आहे. कुंबळेने कसोटी क्रिकेटमध्ये 619 बळी मिळविले होते. कसोटी क्रिकेटमध्ये मुथय्या मुरलीधरन (800 बळी) आणि शेन वॉर्न (708 बळी) यांच्यानंतर कुंबळेचे सर्वाधिक बळी आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्येही 337 बळी मिळविलेले आहेत. कुंबळे कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात पाकिस्तानविरुद्ध दहा बळी मिळविण्याची कामगिरीही करून दाखविलेली आहे.