शिवसेनेची मागणी; शिवजयंती तिथी प्रमाणेच साजरी करा

0
15

मुंबई – गेल्या कित्येक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा वाद सुरु असताना आता शिवजयंती तिथी प्रमाणेच साजरी करावी व तशा प्रकारचा सरकारी आदेश सरकारने काढावा, अशी मागणी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा गेल्या कित्येक वर्षांपासून वाद सुरु आहे. हा वाद संपुष्टात आणावा आणि शिवजयंती मराठी तिथीनुसार फाल्गून वद्य तृतीयालाच साजरी करावी तसेच या दिवशी सरकारी सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी आग्रही मागणी शिवसेनेने केली आहे.