गोंदियात रंगणात उद्यापासून राज्यस्तरीय फुटबाॅल स्पर्धा

0
17

गोंदीया,दि.07ः- जिल्हा पोलीस विभाग व गोंदीया जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने दिनांक ९  ते  १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत ‘राज्य स्तरीय शहीद जवान फुटबॉल स्पर्धा – २०१८ इंदिरा गांधी स्टेडीयम येथे रात्री फ्लड लाईटच्या उजेडामध्ये आयोजित करण्यात आली आहे.ही स्पर्धा एक आठवडा रंगणार असून राज्यातील 16 संघ सहभागी होत आहेत.गेल्या अनेक वर्षानंतर पहिल्यांदा गोंदियात राज्यस्तरीय फुटबाॅल स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याने प्रेक्षकामध्ये सुध्दा उत्सुकता दिसून येत आहे. या स्पर्धेचा उदघाटन सोहळा उद्या रविवारला (दि.९) दुपारी ०३.३० वाजतासामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री इंजि. राजकुमार बडोले,खासदार प्रफुल पटेल, खासदार  मधुकर कुकडे, खासदार अशोक नेते,जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा मडावी, आमदार गोपालदास अग्रवाल,आमदार परिणय फुके, आमदार संजय पुराम, आमदार विजय रहांगडाले,पोलीस उपमहानिरिक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकुश शिंदे,जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील गोंदीया, मुंबई, पुणे, अमरावती, नागपुर, औरंगाबाद या शहरातील विविध एकुण १६ नामवंत संघ सहभागी होत आहेत. त्यामध्ये (१) सेंट्रल बॅक ऑफ इंडीया, मुंबई (२) युनियन बॅक ऑफ इंडीया, मुंबई (३) सेंच्युरियन रॉयन, मुंबई (४) बॉम्बे इंजिनियनिंग ग्रुप, एफ.सी. पुणे (५) इंदिराणी स्पोर्ट्रस क्लब, पुणे (६) एंजल फुटबॉल अ‍ॅकडमी, अमरावती (७) यंग बॉइज फुटबॉल क्लब, औरंगाबाद (८) इंडिपेन्डन्स फुटबॉल क्लब, अमरावती (९) यंग मुस्लिम फुटबॉल क्लब, नागपुर (१०) नागपुर अ‍ॅकडमी फुटबॉल क्लब, नागपुर (११) राहुल फुटबॉल क्लब, नागपुर (१२) रब्बानी फुटबॉल क्लब, कामठी (१३) सिटी क्लब, गोंदीया (१४) गोंदीया फुटबॉल अ‍ॅकडमी, गोंदीया (१५) उत्कल फुटबॉल क्लब, गोंदीया (१६) डब्लींग फुटबॉल क्लब, गोंदीया अशा संघांचा समावेश आहे.
सदरची स्पर्धा ही नॉकआउट पध्दतीने घेण्यात येणार असुन प्रथम विजेत्या संघास ५१,०००/- रुपये, द्वितीय विजेत्या संघास ३१,०००/- रुपये, तृतीय विजत्या संघास २१,०००/- रुपये तसेच ०४ उत्कृष्ठ खेळाडुंना उत्तेजनार्थ विशेष आकर्षक पारितोषिके समारंभपुर्वक वितरीत करण्यात येणार आहेत.
उद्घाटन समारंभानंतर सायंकाळी ०४.०० वा. नागपुर फुटबॉल अ‍ॅकेडमी नागपुर विरुध्द एंजल फुटबॉल अ‍ॅकडमी अमरावती या संघांमध्ये रंगतदार लढत होणार आहे. रात्री ०८.०० वा. यंग बॉईज फुटबॉल क्लब, औरंगाबाद विरुध्द सिटी क्लब, गोंदिया यांचेमध्ये लढत होणार आहे. दोन्ही सामन्यांदरम्यान सायंकाळी ०७.०० वा. चजखङ ११ नागपुर महिला संघ विरुध्द गोंदिया महिला फुटबॉल संघ या महिला संघांमध्ये प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व सामन्यांदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहेत.
तरी गोंदीया जिल्हयातील सर्व नागरिक व क्रिडाप्रेमींनी खेळाडुंचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी मोठया संख्येने दिनांक ९ डिसेंबर ते दिनांक १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत इंदिरा गांधी स्टेडीयम, गोंदीया येथे उपस्थितीत राहण्याबाबत गोंदीया जिल्हा पोलीस विभाग व गोंदीया जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांचे तर्फे आवाहन करण्यात येत आहे.