राज्यातील पहिले शासकीय मोहफुल खरेदी केंद्र तुमसरात

0
52

गोंदिया,दि.24- महाराष्ट्रातील पुर्व विदर्भातच नव्हे तर शेजारील मध्यप्रदेश व छत्तीसगडच्या जंगलव्याप्त परिसरात मोठमोठी मोहफुलाची झाडे हमखास बघावयास मिळतात.गोंदिया-भंडारा जिल्हयात तर मोहरानेच आहेत.त्यातच  संपूर्ण राज्यात मोहफूलाच्या विक्रीवर आणि वाहतूकीवर बंदी असल्याने मोहफुला वरील बंदी उचलून मोहफुलावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरु करण्याची सातत्याने मागणी होत आली आहे.छ्त्तीसगड सरकारने त्यावर कामही सुरु केले आहे.परंतु महाराष्ट्रात अद्यापही हे सुरु झालेले नसले तरी भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात राज्यातील पहिला शासकीय मोहफुल संकलन केंद्र(एन.टी.एफ.पी)योजनेंतर्गत सुरु करण्यात आला आहे.त्यामुळे आदिवासीच नव्हे तर सर्वसामान्य शेतकर्याला सुध्दा या केंद्रावर गोळा केलेला मोहफुल विकता येणार आहे.तुमसर तालुक्यात (एन.टी.एफ.पी.) योजने अंतर्गत महाराष्ट्रातील पहिला शासकीय मोहफूल संकलन केंद्र तुमसर तालुक्यात सुरु करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या आणि आदिवासी लोकांच्या अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी गोळा केलेला वन उपज हा सहज रित्या विकता येणार आहे. सुरुवातीला जंगलातून मोहफूल वेचणी करून त्याला कडक उन्हात वाळविल्या जाते. मोहफूल पूर्णपणे वाळल्या नंतर त्याची विक्री स्थानिक बाजारपेठेत किंवा व्यापाऱ्यांना केली जात होती. मात्र आता पर्यंत मिळेल त्या भावाने स्थानिक व्यापाऱ्यांना त्याची विक्री करत होते. भंडारा वन विभागाच्या पुढाकाराने गौण वन उपज (एनटीएफपी ) या योजने अंतर्गत वनग्राम समिती मार्फत मोहफुलांचे संकलन केंद्र प्रथमच तुमसर तालुक्यात सुरु करण्यात आले असून या समितीमार्फत आठवड्यात दर शुक्रवारी शेतकऱ्यांनी गोळा केलेला मोहफूल प्रति किलो २० रुपये प्रमाणे खरेदी करण्यात येत असून ५०० रुपयां पर्यंत मोहफूल विक्री केल्यास नगदी स्वरूपात याचा मोबदला दिला जातो. तर ५०० रुपयांच्या वर मोहफूल विक्री केले तर विक्रेत्याच्या खात्यात त्वरित याचा मोबदला दिला जातो. त्यामुळे जंगल व्यापात भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासी कुटूंबाना मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त झाला आहे.