हाथसर पीडितेच्या भेटीसाठी निघालेल्या राहुल गांधींना पोलिसांची धक्काबुक्की

0
564

उ. प्रदेश : हाथसरमधील अत्याचार पीडितेच्या भेटीसाठी निघालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी  आणि प्रियंका गांधी यांना उ. प्रदेशात जाण्यापासून रोखण्यात आले आहे. मात्र पीडितेच्या भेटीवर ठाम असलेले राहुल गांधी आणि प्रियंका हे कार्यकर्त्यांसोबत पायी हाथसरकडे निघाले आहेत. यावेळी त्यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी राहुल गांधी यांना धक्काबुक्की केली आहे. या धक्काबुक्कीत राहुल गांधी रस्त्याच्या कडेला पडले. या धक्काबुक्कीत पोलिसांनी राहुल गांधी यांची कॉलर पकडण्याचाही प्रयत्न केला. उ. प्रदेशातील हाथसर येथील तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत.

 

या पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी सकाळीच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे हाथसरच्या दिशेने रवाना झाले. मात्र त्यापूर्वीच उ. प्रदेश सरकारने  हाथसर परिसरात जमावबंदीचे आदेश लागू केले. तसेच राज्याच्या सीमाही उ. प्र्देश सरकारने रोखल्या होत्या. नोएल फ्लाय ओव्हरवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोखल्यामुळे तिथेही वाहनांच्या रांगा होत्या. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता राहुल आणि प्रियंका गांधी यांनी पायी हाथसरला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही कार्यकर्ते आणि माध्यमांचे प्रतिनिधीही होते.

यमुना हायवेवर पोलिसांनीं हा जमाव रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना राहुल गांधी यांची कॉलर पकडत त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न एका पोलीस अधिकाऱ्याने केला. यावेळी झालेल्या झटापटीत राहुल गांधी रस्त्याच्या कडेला पडले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीहल्लाही करण्यात आला. या घटनेनंतरही राहुल गांधी हे हाथसरला जाण्यावर ठाम आहेत. जमावबंदीचे आदेश असले तरी मी एकटा पीडितेला भेटण्यासाठी जाऊच शकतो, अशी भूमिका त्यांनीं घेतली आहे. तर उ. प्रदेश पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत प्रियंका गांधी याही ठिय्या आंदोलनाला बसल्या आहेत.