जवानांवर नक्षलींचा हल्ला, महामार्गावरील स्फोटात 1 शहीद

0
6

वृत्तसंस्था
रायपूर दि.२२:- छत्तीसगडच्या नक्षल प्रभावित झीरम घाटी परिसरात नक्षलवाद्यांनी शुक्रवारी रात्री उशीरा गस्त घालण्यासाठी निघालेल्या एसटीएफ जवानांना लक्ष्य केले. या स्फोटात एक जवान शहीद झाला, तर दोघे जखमी झाले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस्तर जिल्ह्यातील दरभा भागात राष्ट्रीय महामार्ग 30 वरून एसटीएफचे पथक जात असताना पहाटे दोनच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. बस्तर जिल्ह्यात जीराम घाटी येथे काँग्रेस नेत्यांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी मे 2013 मध्ये हल्ला केला. त्याठिकाणापासून हे ठिकाण जवळ आहे. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात एसटीएफचे कृष्ण पाल सिंह हे अधिकारी हुतात्मा झाले आहेत. हल्ल्यात संतोष यादव हा जवान जखमी झाला आहे.

जगदलपूर आणि सुकमा दरम्यान हा राष्ट्रीय महामार्ग असून, झाडाचा आसरा घेऊन नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. एसटीएफचे पथक दरभाकडे निघाले होते.

हा स्फोट एवढा भीषण होता की, रस्त्यावर सुमारे पाच फुटांचा खड्डा तयार झाला. स्फोटानंतर जवळपास लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबाल सुरू केला. जवानांनी प्रत्युत्तरात फायरिंग केली. जवानों आणि नक्षलींमध्ये रात्री 2 वाजेपासून चार वाजेपर्यंत चकमक चालली.त्यानंतर नक्षलवादी फरार झाले. हल्ल्यात एसटीएफचा प्लाटून कमांडर कृष्ण प्रताप सिंह शहीद झाले. ते मध्यप्रदेशच्या भिंड येथील रहिवासी होते. त्यांचे वडील आर्मीतून निवृत्त झाले आहेत. तर लहान भाऊ आर्मीत असून लैहमध्ये तैनात आहे.

झीरम घाटी हा परिसरा नक्षलवाद्यांचा गड मानला जातो. त्यामुळे या परिसरातून जाताना जवान अधिक काळजी घेत असतात. रात्रीच्या घटनेतही ब्लास्टनंतर जवान लगेचच अलर्ट झाले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवानांना सावरायला आणखी थोडा वेळ लागला अशता तर मोठी दुर्घटना झाली असती. झीरममध्येच मे 2013 मध्ये नक्षलवाद्यांनी काँग्रेस नेत्यांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात 30 पेक्षा अधिक नेत्यांचा मृत्यू झाला होता. मार्च 2014 मध्येही नक्षलींनी गस्त घालण्यासाठी निगालेल्या जवानांवर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 15 जवान शहीद झाले होते.