शेअर बाजार पुन्हा क्रॅश, 317 अंकांनी कोसळला सेन्सेक्स

0
15

मुंबई दि. २६- आठवड्याच्या पहिल्या दिवशी अर्थात सोमवारी विक्रमी घसरण झाल्यानंतर मंगळवारी भारतीय शेअर बाजार थोडासा सावरला. परंतु, बुधवारी सकाळी पुन्हा एकदा शेअर बाजार गडगडला. बाजार उघडल्यानंतर पहिल्या टप्प्यात सेन्सेक्स 317 अंकांनी घसरून 25,719 वर पोहोचला. निफ्टीतही झाली 59 अंकांची घसरण झाली.

आठवड्याच्या तिसर्‍या दिवशी देखील शेअर बाजारात चढउतार कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात बुधवारीही स्थिती फारशी चांगली राहणार नसल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी सेन्सेक्स आणि निफ्टी एक टक्क्याने खाली खसरले. एनएसईच्या सर्व सेक्टर इंडेक्समध्ये आज लाल निशाण पाहायला मिळाले. सद्यस्थितीत बीएसईच्या 30 शेअर्सच्या प्रमुख इंडेक्समधील सेंसेक्स 317 अंकांनी गडगडून 25,832.87 वर पोहोचला.