राष्ट्रकुल घोटाळा: पाच दोषींना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

0
16

नवी दिल्ली, दि. २ – २०१० मधील राष्ट्रकुल घोटाळ्याप्रकरणी बुधवारी दिल्लीतील न्यायालयाने पहिली शिक्षा सुनावली असून पाच दोषींना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आली आहे. यामध्ये दिल्ली महापालिकेतील चार अधिका-यांचा समावेश आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत पथदिव्यांच्या घोटाळ्याप्रकरणी दिल्लीतील न्यायालयासमोर सुनावणी सुरु होती. बुधवारी न्यायालयाने याप्रकरणात निकाल दिला असून दिल्ली महापालिकेतील चार व आणखी एक दोषीला कोर्टाने चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तर मुख्य आरोपी व स्वेका पॉवरटेकचे व्यवस्थापकीय संचालक टी पी सिंह यांना सहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.