पाकिस्‍तानने केली केरळ सरकारची वेबसाइट हॅक

0
7

वृत्तसंस्था
कोट्टयाम दि. २७- पाकिस्तानी हॅकर्संनी केरळ सरकारची अधिकृत वेबसाइट “www.kerala.gov.in शनिवारी रात्री हॅक केली. दरम्‍यान, त्‍यावर भारत विरोधी मजकुर अपलोड केला. त्‍यात लिहिले, ‘भारतीयांना आपण सुरक्षित असल्‍याच्‍या भ्रमात जगत आहेत, आम्‍ही पाकिस्‍तानी हॅकर्स आहोत’ असा संदेशही होमपेजवर लिहिला असून, ‘पाकिस्‍तान जिंदाबाद’चा नाराही पोस्‍ट केला आहे. दरम्‍यान, केरळ साइबर शाखा याचा तपास करत आहेत.
केरळ सरकारच्‍या अधिकृत वेबसाइटला हॅक केल्‍यानंतर हॅकर्सने त्‍यावर संदेश लिहिला की आम्‍ही पाकिस्‍तानी आहोत. भारतीयांना ते सुरक्ष‍ित आहेत, असे वाटत असेल तर तो त्‍यांचा भ्रम आहे, असा मजकुर त्‍यावर अपलोड करून भारतीय राष्‍ट्रध्‍वज जाळत असलेला फोटोसुद्धा पोस्‍ट केला.

या बाबत मुख्यमंत्री ओमन चांडी आज (रविवार) पत्रकारांना महणाले, हा प्रकार अत्‍यंत गंभीर आहे. वेबसाइट हॅकर्सपासून मुक्‍त केली असून, ती सुरळीत करण्‍याचे काम सुरू आहे. हॅकर्सने या साइटचे सर्वर हॅक केलेले नव्‍हते.एप्रिल 2015 मध्‍ये हॅकर्संनी कोच्ची मेट्रो रेल्‍वेची बेवसाइट हॅक केली होती. त्‍यावर इस्राइल विरोधी मजकूर पोस्‍ट करण्‍यात आला होता.