छोटा राजन दिल्लीत सीबीआयच्या कोठडीत

0
8

नवी दिल्ली, दि. ०६: अनेक गुन्ह्यांमध्ये भारताला हवा असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला आज (शुक्रवार) सकाळी इंडोनेशियाहून भारतात आणण्यात आले. राजनला तब्बल 27 वर्षांनंतर भारतात परत आणण्यात यश आले आहे.

छोटा राजन ऊर्फ राजेंद्र निकाळजे याला इंडोनेशियातील बाली येथून विशेष विमानाने दिल्लीच्या पालम विमानतळावर परत आणण्यात आले. 
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या दिल्ली येथील मुख्यालयात छोटा राजनला सध्या ठेवण्यात आले आहे. मुख्यालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाय मुंबई पोलिसांनी छोटा राजनच्या गुन्ह्यांचा तपासही सीबीआयकडे सोपवला आहे. या तपासात मुंबई पोलिस सीबीआयला आवश्यक ती मदत करेल, असे सरकारने सांगितले आहे.