धान खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार

0
14

साकोली दि.६:शेतकर्‍यांची दलालामार्फत लुट होऊ नये यासाठी शासनातर्फे आधारभूत धान खरेदी केंद्र उघडून शेतकर्‍यांचे धान खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयातर्फे नुकताच आदेश प्राप्त झाला असून या धान खरेदी केंद्रावर शासनाच्या निर्णयाप्रमाणे धान खरेदी करून त्याला भाव मिळणार आहे. यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.
सन २0१५-१६ च्या खरीप हंगामासाठी शासनाने धान्याचे भाव जाहीर केले असून आधारभूत किमतीचा लाभ होण्याच्या दृष्टीने व शेतकर्‍यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये यासाठी राज्य स्तरावर नियंत्रण कक्ष उघडण्याच्या सूचनाही केंद्र शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील शेतकर्‍यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ मिळावा या हेतूने राज्यात उघडण्याकरिता शासनाने आदेश दिले आहे. दिवाळीपूर्वीच धान खरेदी केंद्र सुरु होणार आहेत.