देहव्यवसायामूळे सिव्हिललाईनवासी त्रस्त,पोलीस वसुलीच्या भूमिकेत ?

0
6

खेमेंद्र कटरे

गोंदिया,दि.6- नागपूर पाठोपाठ आता गोंदियासुद्धा सेक्स रॅकेटच्या कचाट्यात सापडले आहे. शहरात हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालविणाèया महिलांची टोळी सक्रिय असून यात काही हॉटेल व्यावसायिकच नव्हे तर काही पोलीस कर्मचारी  सुद्धा सामील असल्याचे बोलले जाते. उल्लेखनीय म्हणजे पोलिसातील काही लोकांना या व्यवसायाबद्दल पूर्ण माहिती असून त्या माहितीच्या आधारे पैसा उकळण्यात ते कर्मचारी गर्क असल्याची माहिती समोर येत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील सिव्हील लाईन भागातील नुरी चौक ते मामा चौक दरम्यान काहींनी देहव्यवसायाला सुरवात केली असून या देहव्यवसाय चालविणार्या महिलासोबत काही शहर पोलीस ठाण्यातील पोलीसांचे सुध्दा हितसंबध जुळले असल्याचे बोलले जात आहे.त्यातच गेल्या आठवड्यात एका माजी नगरसेवकाच्या उपस्थितीत नुरी चौकातील 20 ते 30 जणांनी रात्री 11-12 च्या सुमारास एका घरासमोर जाऊन आपल्या परिसरात अशाप्रकारचे काम चालणार नाही अशा शब्दाता सुनावले होते.त्या रात्रीला काही गोंदिया शहरातील दोन ते तीन पोलीस सुध्दा त्या ठिकाणी गेले होते ते पोलीस कोण याचा शोध घेणे सुरु असून त्यांनी आम्ही समजवितो यापुढे होणार नाही असे सांगत रात्रीला परिसरातील जनतेला परत पाठविले होते.परंतु त्यांनतही दिवसाढवळ्या हा प्रकार खुले आम सुरु असल्याने परिसरातील नागरिक मोठ्याप्रमाणात त्रस्त झाले आहेत.विशेष सदर महिलेचे घरात बाहेर गावावरुन मुलीना आणले जात असल्याचीही चर्चा आहे.या व्यवसायाचा काही भाग पोलीसांच्या एका विशेष शाखेतील काहींना मिळत असल्याचेही बोलले जाते.पोलीसच अशा प्रकारे आपले हात धूवून आम्ही इमानदार असल्याचे सांगत असतील काय होणार अशी आपबीती नाव न प्रकाशीत करण्याच्या अटीवर या भागातील महिला पुरुष सांगत आहेत.गुरुवारला पोलीसांचा डग्गा त्या भागात गेला होता पंरंतु त्यानंतर काय झाले कुणालाही कळले नाही.अशा काही पोलीस कर्मचारीमूळे मात्र शहरातील अवैध व्यवसाय बद करण्यासाठी कामाला लागलेल्या ठाणेदारावरही शंकेचे नजरेने बघितले जाते.
नागपूर सारख्या मोठ्या शहरात देहव्यापाराचा धंदा चालतो, हे सर्वश्रुत आहे. पण आता या व्यवसायाने गोंदिया सारख्या सभ्य आणि छोट्या शहरालाही आपल्या जाळ्यात ओढले आहे. या व्यवसायाला पोलिस विभागातील काही मंडळींनी पैसे कमावण्याचा धंदा केल्याने सामाजित आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात सेक्स रॅकेट चालविणारी महिलांची टोळी सक्रिय असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे येथील काही हॉटेल व्यवसायी सुद्धा यात सहभागी असल्याचे बोलले जात आहे. या हॉटेल व्यावसायिकांना गोंदिया शहर व रामनगर पोलिस ठाण्यातील काही पोलिस कर्मचाèयांचे संरक्षण प्राप्त असल्याचीही कुणकूण आहे.
हे कर्मचारी एखाद्या मुलीला पकडून मोठ्या व्यक्तीकडून तगडी रक्कम वसूल करण्यासाठी रात्रीच्यावेळी धाड टाकण्याचे प्रकारही करीत असतात अशी चर्चा आहे.
बालाघाट मार्गावरील एका मोठ्या इमारतीमध्ये सुद्धा सेक्स रॅकेटचा व्यवसाय चालविला जात असल्याचे बोलले जाते. काही तथाकथित महिलांनी ब्युटीपार्लरच्या माध्यमातून हा व्यवसाय थाटल्याने सरळ मार्गाने ब्युटीपार्लरचा व्यवसाय करणाèया महिलांना त्याचा त्रास होऊ लागला आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी सिव्हिल लाइन भागातील एका पार्लरवर पोलिसांनी धाड टाकली होती, अशी चर्चा देखील दबक्या आवाजात सुरू आहे. परंतु, त्या धाडीचे सत्य काय आहे ते पोलिस विभागाकडून कळू शकले नाही.