दहशतवाद्यांबरोबर चकमक, कर्नल संतोष महाडीक शहीद

0
6
श्रीनगर  दि. १७ – जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली आहे. त्यात जखमी झालेले आर्मीचे कर्नल संतोष महाडीक शहीद झाले. सोमवारी रात्री हे एन्काऊंटर सुरू झाले होते. कर्नल महाडीक मंगळवारी सकाळी जखमी झाले होते. यात जखमी झालेल्या इथर चार जवानांवर उपचार सुरू आहेत. दहशतवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे असून ते मोठ्या प्रमाणावर फायरिंग करत असल्याची माहिती मिळाली आहे.
 दहशतवाद्यांबरोबर चकमकीत शहीद झालेले संतोष महाडीक हे 41 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडींग ऑफिसर होते.  सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांनी संतोष यांच्या टीमवर हाजी नाका येथील दाट जंगलामध्ये हल्ला केला. त्याचवेळी ते जखमी झाले होते.