आदिवासींवरील अन्याय करणारा जीआर रद्द करण्याचे मुख्यमंत्र्याचे आश्वासन

0
15

गोंदिया,दि.17-राज्यातील खर्या आदिवासी समाजावर अन्याय करणारा शासनाचा 21 आक्टोंबर 2015 चा शासन निर्णय रद्द करुन आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्याच्या मागणीला घेऊन आज मंगळवारला गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार व भाजप आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक नेते यांच्या नेतृत्वात आमगाव-देवरीचे आमदार संजय पुराम,गडचिरोलीचे आमदार डाॅ.देवराव होळी,आमदार कृष्णा गजबे,आमदार राजू तोडसाम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली.तसेच त्यांना मागण्याचे एक निवेदन सादर केले.सन 1995 पुर्वी अवैध आदिवासींनी अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर नोकरीसाठी अवैध प्रमाणपत्र सादर करुन नोकरी बळकावली.त्यामुळे लाखो वैध आदिवासी युवक आज नोकरीपासून वंचित झाल्याने त्यांच्यावर झालेला हा अन्याय दूर करण्यात यावे.तसेचआज तारखेपासून अनूसुचित जमातीचे वैध प्रमाणपत्र असल्याखेरीज कोणत्याही उमेदवारास नोकरी देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशन सुरु होण्याअगोदर 5 डिसेंबर पर्यंत यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार संजय पुराम यांनी बेरार टाईम्सला दिली आहे.