मी घाबरत नाही, तुरुंगात जायलाही तयार आहे – राहुल गांधी

0
10

वृत्तसंस्था

नवी दिल्ली ,दि १९ राहुल गांधी यांनी स्वत:ला ब्रिटीश नागरीक म्हणून जाहीर केले आहे या भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या आरोपावरुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट नरेंद्र मोदी सरकारला आव्हान दिल आहे.

मोदीजी पंतप्रधान आहेत. त्यांच्याकडे सर्व तपास यंत्रणा आहेत. त्यांनी माझ्यावर अनेक आरोप केले आहेत. मग ते माझ्या चौकशीचे आदेश का देत नाहीत ? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे.

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मी मोदीजींना घाबरत नाही. मी तुरुंगात जायलाही तयार आहे. पण माझ्यासह कुटुंबावर निरर्थक आरोप करणा-यांना मोदींनी आधी रोखावे असे राहुल म्हणाले.