आर्थिक घोटाळा?‘एस पी एन जे‘ कंपनी विरोधात तक्रार

0
23

गोंदिया- अलीकडे सुशिक्षित बेरोजगारांना हेरून आणि त्यांना आर्थिक मिळकतीचे प्रलोभने देऊन लोकांना फसविण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. शहरांसह ग्रामीण भागात अभिकत्र्यांचे जाळे निर्माण करून नागरिकांना मोठा मोबदला वा भूखंड विकासाचे स्वप्न दाखवत त्यांच्या कष्टाची मिळकत गिळंकृत केली जात आहे. दिवसेंदिवस असे प्रकार उजेडात येत असले तरी नवनवीन कंपन्या आपला गोरखखंधंदा मात्र कमी करताना दिसत नाही. आता आणखी यात नव्याने एकाची भर पडली असून लँड डेवलपमेंटच्या नावाखाली लोकांचा पैसा गोळा करणाèया छत्तीसगड राज्यातील ‘एस. पी. एन. जे.‘ या कंपनीच्या अभिकत्र्यांसह गुंतवणूकदारांनी गोंदियाच्या पोलिस अधीक्षकांकडे फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत कंपनीचे मुख्य प्रबंध संचालक राजकुमार बॅनर्जी (रा. रायपूर), शाखा व्यवस्थापक रुकसार (रा.गोंदिया), विजय मेश्राम, नारायण कुंभरे (रा. दल्ली राजहरा), शिवप्रसाद शाहू (रा. मोहगाव, ता.देवरी), विजय तांडेकर, सुनील बांगरे, उमेश कावळे (रा. छोटा गोंदिया) लक्ष्मीनारायण सोनवाने (रा. लोहारा, ता.देवरी) यांच्या नावांचा समावेश आहे.
अर्जदार किशोर मेश्राम (रा. मुरदोली) महेश शहारे (रा. रिसामा), तुलारामqसह पवार (रा. किडंगीपार), अरुण फुंडे (रा. किकरीपार), महेश भुते, (रा. किकरीपार), आत्माराम दोनोडे (रा. कारंजा. ता. लांजी), शिवदास बिसेन (राहणार किकरीपार), भगवानदास बिसेन (रा. किकरीपार), वीरेंद्र सतदेवे (रा. पळसगाव) सुशीला फटींग (रा. गांधीटोला), ग्यानीराम डोये (रा. पदमपूर), सुभाष कांबळकर (रा. शिवणी), नरेंद्र मेश्राम (रा. किकरीपार) याप्रमाणे आहेत.
सविस्तर वृत्त असे की, वरील गैरअर्जदारांनी एस पी एन जे लँड प्रोजेक्ट अँड डेवलपर्स इंडिया लिमिटेड नावाने छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे कंपनी सुरू केली. या कंपनीचे कार्यालय गोंदिया येथे जयस्तंभ चौकात सॅटेलाइट टॉवर येथे सुरू करण्यात आले. या कार्यालयातील वरील गैरअर्जदार यांनी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात ग्राहक तयार करून ठेवी मिळविण्याच्या हेतूने एजेंट्सचे जाळे निर्माण केले. या एजेंट्सच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांचे पैसे डबल करणे, ठेवींच्या मोबदल्यात मासिक पेंशन देणे आदी योजना सुरू केल्या. कंपनीने सुरवातीच्या काळात सुरळीत पेंशन दिल्याने ग्राहकांचा आणि त्या कंपनी साठी कलेक्शन करणाèया एजेंटचा हळूहळू विश्वास बसला. याचा फायदा कंपनीच्या वरील गैरअर्जदारांनी घेत एकट्या गोंदिया जिल्ह्यातून सुमारे पाच कोटींच्यावर ठेवी मिळविल्याचे तक्रारदार यांनी पोलिस अधीक्षकांना केलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे. पुढे दोन वर्षांनंतर गोंदिया येथील कार्यालय बंद करण्यात आल्याने ग्राहकांना शंका येऊ लागली. एजेंट म्हणून काम करणाèया बेरोजगार युवकांना त्यांचे कमिशन व टीडीएस ची रक्कम मिळणे बंद झाले. अनेक ठेवीदारांची मॅच्यूरिटी जवळ येऊ लागल्याने या एजेंट्सची qचता वाढू लागली. ग्राहकांचा तगादा वाढल्याने त्यांनी वरील गैरअर्जदारांना विचारणा करणे सुरू केल्याने त्यांनी या एजंटांना रायपूर येथे बैठकीसाठी मे २०१५ ला घेऊन गेले. तेथे कंपनीच्या मालकांकडे तक्रारी मांडण्यात आल्यावर सेबीने लँड डेवलqपगवर बंदी आणल्याने एस पी एन जे कंपनी बंद करून त्याऐवजी एसपीएमजे अशी नवीन कंपनी सुरू करू असे आश्वासन देण्यात आले व ग्राहकांच्या ठेवी दोन महिन्यात परत करण्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, वरील गैरअर्जदारांनी आम्ही कंपनीचे संचालक असल्याची बतावणी करून कंपनीने पैसे परत केले नाही तर आम्ही आपली संपत्ती विकून तुमचे पैसे देणार, अशी हमी दिल्याने ठेवीदारांनी त्यांचेवर विश्वास ठेवला. परंतु. आता मुदत पूर्ण झाल्यावर त्यांचे पैसे परत करण्याऐवजी कंपनीने गोंदिया येथील आपल्या कार्यालयाला कुलूप लावून पळ काढल्याचा तक्रारदारांचा आरोप आहे. आरडी खात्यावर एक लाखाच्या ठेवीवर ३हजार ४०० रुपये एवढी प्रचंड रक्कम मासिक पेंशन म्हणून दिली जात होती. गेले दोन वर्षे सतत पेंशन मिळत असल्याने अनेक जण या मोहात अडकले. पुढे ही पेंशन मिळणे बंद झाल्याने ठेवीदारांनी तगादा लावला. ग्राहक वरील गैरअर्जदारांच्या घरी गेल्यावर ते हजर मिळत नाही आणि त्यांनी आपले फोन ही घेणे बंद केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक विचारणा केल्यावर वरील गैरअर्जदार दमदाटी करीत असल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आपली फसगत झाल्याने गैरअर्जदारांवर कारवाई करून आपला पैसा परत मिळवून देण्याची विनंती अर्जदारांनी पोलिस अधीक्षकांना केली आहे.