पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला, तीन जवान हुतात्मा

0
10

पठाणकोट – पंजाबमधील पठाणकोट एअरफोर्स बेसवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. दोन हेलिकॉप्टरने सर्च ऑपरेशन सुरु आहे. एअरबेसमध्ये अजून तीन दहशतवादी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हल्ल्याच्या आधी गुरुवारी गुरदासपूरचे निवृत्त पोलिस अधीक्षक आणि आता पोलिस असिस्टंट कमांडेटचे चार जणांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यामध्ये चार दहशतवादी ठार झाले तर तीन जवान हुतात्मा झाले.

शनिवारी पहाटे पंजाबमधील पठाणकोट येथे लष्कराच्या वेषातील साधारण चार दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या तळाजवळ घुसले. त्यांनी तुफान गोळीबार सुरू करत तळावर हल्ला केला.

सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. पठाणकोट राष्ट्रीय सुरक्षा पथक आणि दहशतवादी यांच्यात पाच तास चकमक सुरू होती. या चकमकीत चारही दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. मात्र, यामध्ये तीन जवान हुतात्मा झाले.

जम्मू-पठाणकोट महामार्गावर नाकाबंदी करण्यात आली. तसेच पंजाब आणि जम्मू काश्मिरमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारत-पाकिस्तानमधील मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये अडथळे आणण्यासाठी लष्करे तैयबाने हा हल्ला घडविला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल घटनास्थळी दाखल झाले आहेत.

‘पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची निर्भत्सना करतो. शहीद भारतीय जवानांच्या कुटुंबियांसाठी शोक व्यक्त करत असल्याचे ट्विट काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे.

एक दिवसापूर्वीच असिस्टंट कमाडेंटच्या अपहरणानंतर आर्मीने केले होते अलर्ट
– पठाणकोटजवळील पाकिस्तान बॉर्डरवरील नरोट जमैलसिंग परिसरातून पंजाब आर्म्ड पोलिसच्या (पीएपी) 75 बटालियनचे असिस्टंट कमांडेंट सलविंदर सिंग, त्यांचे मित्र राजेश आणि कुकचे शुक्रवारी रात्री अपहरण करण्यात आले होते.
– 4 अपहरणकर्ते आर्मीच्या वेषात होते. यामुळे पोलिस, बीएसएफ आणि आर्मीने यामध्ये दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला होता.
– स्क्वॅट टीम आणि अमृतसर, गुरुदासपूर येथून फोर्स मागवण्यात आली आहे.
पाच महिन्यात पहिला हल्ला
– जुलैमध्ये गुरुदासपूर जिल्ह्यातील दीनानगर येथे दहशतवादी हल्ला झाला होता. दीड तासात सात हल्ले झाले होते.
– 20 वर्षांनंतर पंजाबमध्ये एवढा मोठा हल्ला झाला, 11 तासांच्या एन्काउंटरनंतर दहशतवाद्यांना मारण्यात आले होते.