विद्यार्थ्यांकरीता निबंध स्पर्धा १५ जानेवारीपर्यंत निबंध मागविले

0
10

गोंदिया,दि.२ : समाजामध्ये समता, बंधुता निर्माण होऊन अस्पृश्यता निर्मुलन होण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही निबंध स्पर्धा सन २०१४-१५ व २०१५-१६ या वर्षाकरीता असून यामध्ये सहभागी होण्याकरीता महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांनी (१) अस्पृश्यता मानवतेला कलंक (२) स्त्री-पुरुष समानता काळाची गरज यापैकी एका विषयावर कमीत कमी ३५० ते ५०० शब्दात निबंध लिहून १५ जानेवारीपर्यंत सहायक आयुक्त, समाजकल्याण, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, सामाजिक न्याय भवन येथील कार्यालयात सादर करावे. निबंधाच्या शेवटी विद्यार्थ्याने आपले पूर्ण नाव, शाळा/महाविद्यालयाचा पत्ता व मोबाईल क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पत्राद्वारे व दूरध्वनीद्वारे कळविण्यात येईल. पाठविण्यात येणाऱ्या निबंधाच्या लिफाफ्यावर विद्यार्थ्याने पूर्ण नाव व पत्ता लिहावा. स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्याला दोन हजार रुपयाचे, द्वितीय पारितोषिक एक हजार पाचशे रुपये व तृतीय एक हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात येतील. अधिक माहितीकरीता समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा. असे सहायक आयुक्त सुनील जाधव यांनी कळविले आहे