व्यसनमुक्त साहित्य संमेलन ;समारोपीय कार्यक्रमाला उदघाटकाची नवी परंपरा

0
14

समेंलनाध्यक्ष असतानाही कार्यक्रम अध्यक्ष ?

जिल्ह्यातील साहित्यक्षेत्रात पत्रिका चर्चेचा विषय

खेमेंद्र कटरे,

गोंदिया – सामाजिक न्याय व विशेष सह्याय विभागाच्यावतीने येथे चौथे व्यसनमुक्ती राज्यस्तरीय साहित्य संमेलन येत्या 22 जानेवारी ला होत आहे. या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनापासून तर 23  जानेवारीला होणा-या समारोपापर्यंत तयार करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेकडे बघून शासनाने साहित्य संमेलनाच्या  निकषाना बाजू सारत नव्या पंरपरांचा उदय केल्याची चर्चा साहित्यक्षेत्रातून समोर आली आहे.

या साहित्य संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेवरून सध्या गोंदिया-भंडारा जिल्हयातील साहित्यिक वर्तुळात खळबळ माजली आहे. या निमंत्रणपत्रिकेतील अध्यक्ष आणि समारोपीय कार्यक्रमाचे उद्घाटक या विषयाला घेवून ज्येष्ठ कवि व विदर्भ साहित्य संघाचे सदस्य माणिक गेडाम यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी साहित्य संमेलनाचा संमेलनाध्यक्षच हा समारोपीय कार्यक्रमाचाही अध्यक्ष असतो. तर कुठलेही साहित्य संमेलन असो की इतर संमेलन त्या समारोपीय कार्यक्रमाला उदघाटक कधीच नसतो. परंतु या कार्यक्रमातील पत्रिकेकळे बघून आयोजकांनी असे का केले हे साहित्य क्षेत्राच्या पलीकडले असल्याचे सांगितले.  तर झाडीबोली साहित्य चळवळीचे प्रणेते डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांना ही या संदर्भात विचारणा केली असता समारोपीय कार्यक्रम हा शेवटचा टप्पा असल्याने उदघाटन पुन्हा कसे होईल असा प्रश्न उपस्थित करीत उदघाटकाएैवजी विशेष पाहुणे राहू शकतात.आणि समेलनाध्यक्ष असतांना  दुसरे कार्यक्रम अध्यक्ष राहू शकत नाही असे सांगितले.

कुठलाही  साहित्य संमेलन असो त्या साहित्य संमेलनाचा संमेलनाध्यक्ष हाच समारोपाला सुद्धा अध्यक्ष असतो.त्यामुळे कार्यक्रम अध्यक्षाची गरजच नसते.परंतु गोंदिया येथे  आयेाजित चैोथे व्यसनमुक्त साहित्य संमेलनाचा उदघाटन सत्राला समेलनाध्यक्ष असताना पुन्हा कार्यक्रम अध्यक्ष आणि समारोपीय कार्यक्रमालाही तेच सुत्र अवलबण्यात आले.यात साहित्यकानुसार कुठल्याच समारोपीय कार्यक्रमाला उद्धाटक नसतो. मात्र या व्यसनमुक्त साहित्य संमेलनाच्या समारोपाला उद्धाटक म्हणून केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक व जहाजराणी मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित राहणार आहेत.