गौरव आत्महत्या प्रकरण: गोंदियात श्रध्दांजंली

0
11
गोंदिया,दि.20-हैदराबाद केंद्रीय विद्यापीठात रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याने केलेली आत्महत्या आणि त्यासंदर्भात केंद्रीय श्रम राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्यावर गुन्हा नोंदविला जाण्यावरून मंगळवारी राजकारण आणखी तापले व हैदराबादसह दिल्ली, मुंबई व पुण्यातही याचे संतप्त पडसाद उमटले. केंंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय, विद्यापीठाचे कुलगुरू पी. अप्पा राव यांच्यासह रोहितला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करीत विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली.त्यातच आज बुधवारला गोंदियात सामाजिक जनजागृती मंचच्यावतीने तसेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्यावतीने रोहीत वेमुलास श्रध्दांजली वाहण्याकरीता रॅली काढण्यात आली.तसेच येथील आंबेडकर चौकात एकत्रित होऊन श्रधद्ाजंली वाहण्यात आली.त्यानंतर उपविभागीय अधिकारी मार्फत राष्ट्रपतीना निवेदन पाठविण्यात आले.नेतृत्व अनिल सुखदेवे,महेंद्र कठाने,यशपाल डोंगरे,धिरज मेश्राम यंाच्यासह मोठ्या सख्येने विद्यार्थी व समाजबांधव सहभागी झाले होते.