प्रत्येक व्यक्तीला कायद्याची माहिती असावी- मु.ग.गिरटकर

0
15

गोंदिया,दि.२० : सामान्य नागरिकांना कायदयाची माहिती व्हावी व न्यायापासून कोणीही वंचित राहू नये. कायदयाअंतर्गत संरक्षणाची प्रक्रियेची माहिती सर्वांना असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मु.ग.गिरटकर यांनी केले. गोरेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कुऱ्हाडी येथील आयोजित कायदेविषयक साक्षरता शिबिरात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, त्रिमुर्ती बिगर शेती सहकारी पतसंस्था कुऱ्हाडी, कुऱ्हाडी पंचायत कार्यालय व जिल्हा वकील संघाच्या संयुक्त वतीने कायदेविषयक साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  वन विभागाचे सहायक वनसंरक्षक एच.एन.शेंडे, तज्ञ मार्गदर्शक, माजी जिल्हा सरकारी वकील बिणा बाजपेयी, जिल्हा वकील संघाचे टी.बी.कटरे, ॲड.ओ.जी.मेठी, गोरेगाव पंचायत समितीचे सभापती दिलीप चौधरी उपस्थित होते.
एन.च.शेंडे यांनी वन कायदयाअंतर्गत असलेल्या तरतुदी व जंगली जनावरांपासून शेतीचे नुकसान झाल्यास मिळणारी नुकसान भरपाई याबाबत माहिती दिली. बिणा बाजपेची यांनी बालकांकरीता असलेल्या बाल न्याय कायदयाविषयी मार्गदर्शन केले. टी.बी.कटरे यांनी जिल्ह्यातील ग्राम व विधी दक्षता व सहाय केंद्राअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवांविषयी माहिती दिली. शिबीर कार्यक्रमाला गोरेगाव येथील तेजस्वीनी बचतगटाच्या महिला उपस्थित होत्या.
यावेळी मुख्य न्याय दंडाधिकारी प्र.ह.खरवडे, अति.सहदिवाणी न्यायाधीश एस.एस.जरुदे, एस.शाहीद, आर.डी.भुयारकर, जिल्हा न्यायालयाच्या प्रबंधक नलिनी भारद्वाज, ॲड.राजकुमार बोंबार्डे, सहायक सरकारी वकील पराग तिवारी, वाय.एच.हरिणखेडे, गोरेगाव पंचायत समितीचे उपसभापती सुरेंद्र बिसेन, त्रिमुर्ती बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा शिला तिवारी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष डी.एम.राऊत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे महेंद्र पटले, एस.यु.थोरात, कपिल पिल्लेवान, आर्यचंद्र गणवीर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ॲड.शबाना अंसारी यांनी केले तर उपस्थितांचे आभार पोलीस पाटील हेमराज सोनवने यांनी मानले