गुणवाढप्रकरणी दोन प्राध्यापकांना एसीबीने केली अटक

0
6

भंडारा दि.7: प्रात्यक्षिक परीक्षेत गुण वाढवून देण्याकरिता परीक्षकांनी ७५ हजारांची मागणी केली होती.त्यातील ३0 हजार रुपये घेताना परीक्षक प्राध्यापकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा रचून अटक केली. सदर कारवाई तुमसर येथील शारीरिक शिक्षण महाविद्यालयात शनिवारी सायंकाळी करण्यात आली.आरोपी प्राध्यापकांचे नाव राजेंद्र पांडुरंग बहाळे (६0) ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय नागपूर व हितेश डायाभाई राठोड (४२) साकेत शारीरिक शिक्षण महाविद्यालय गोंदिया असे आहे.
विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेतली. त्या दरम्यान प्रा.बहाळे यांनी तक्रारकर्त्याला कॉलेजमध्ये बोलावून बीपीई विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा दि. ६ ला संपत आहे. बरेच मुलं नापास होत आहेत. जर विद्यार्थ्यांना चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करायचे असेल तर मी त्यांचे गुण वाढवून देतो. सर्व विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपये घेऊन मला ७५ हजार रुपये मागून द्या, असे सांगितले. दि. ६ (शनिवारी) सायंकाळी ४ पर्यंत रक्कम दिली नाही तर विद्यार्थ्यांना कमी गुण देऊन अनुत्तीर्ण करेल, अशी धमकीही दिल्याचे लाचलुचपत विभागाकडे दिलेल्या तक्रारीत केल्याने लाचलुचपत विभागाने सुध्दा तक्रारीचे गांर्भीय घेत लगेच कारवाई करीत संबधित प्राधापकाना अटक केली.