छत्रपती शिवाजी महाराज सर्वगुणसंपन्न राजे: किशोर धुमाळ 

0
29
मराठा सेवा संघाच्या वतीने शिवाजी ‘महाराज जयंती’ साजरी
गोंदिया,दि.19-शिवाजी ‘महाराज म्हटले की, अंगावर शहारे उभे राहतात. या भूतलावरील ते एक‘मेव उदाहरण असावे. शिवाजी ‘महाराज म्हणजे समाजकार्य, लोकहित, ‘महिलांचे संरक्षण, गरिबांचे कैवारी, स्थापत्य कलेत निपूण, तिक्ष्ण बुद्धिवंत दुरदर्शी अशा अनेक गुणांनी परिपूर्ण व्यक्तीमत्व होते. त्यांचे नाव  घेतल्याने नवचैतन्य संचारते, असे प्रतिपादन गोंदिया वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी केले.
‘मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त वतीने आज,19 फेब्रु. शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नमाद ‘महाविद्यालयाच्या इतिहास विभागप्रमुख डॉ. अलोणे होत्या. यावेळी रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार, रावणवाडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुरेश निंबाळकर, महेंद्र ‘माने, निवृत्त प्राध्यापक श्री ‘मांढरे उपस्थित होते.
प्रास्ताविक युवराज माने यांनी ‘मांडले. किशोर धुमाळ पुढे म्हणाले, उत्तम‘ प्रशासक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आदराने घेतले जाते. शिवाजी ‘महाराजांच्या जीवनचारित्रावर आजवर अनेक देशी आणि परदेशी विचारवंतांनी लेखन केले. त्यांच्या जीवनचरित्रावर परदेशांतील शाळांमध्ये शिक्षण देण्यात येते. शिवाजी ‘महाराज यांच्यासारखा राजा यापुढे झाला नाही आणि नंतर देखील होणार नाही. त्यांचे विचार प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. खोट्या इतिहासाचा प्रचार करण्यापेक्षा प्रत्यक्षातील शिवाजी ‘महाराज समजावून सांगण्याची जबाबदारी समाजातील सुशिक्षितांनी पेलणे गरजेचे आहे. डॉ. अलोणे म्हणाल्या, शिवाजी ‘महाराज हे नावच अलौकिक आहे. त्यांना
घडविण्याची कामगिरी आई जिजाऊंनी केली. भल्या-बु-याचा, अन्याय-प्रतिकाराचा, उपकार-परोपकाराची माहिती त्यांनी शिवबांना लहानपणीच दिली. त्यामुळे शिवाजी ‘महाराज एका सरदाराच्या मुलाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. संचालन अॅड. सचिन बनसोड यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत सविता तुरकर यांनी केले. याप्रसंगी  सागर सोनवाने, ओमप्रकाश सपाटे, संजय राउत, खेमेंद्र कटरे, सावन डोये,विकास बोरकर, आनंद मेश्राम, ललकार बंसोड, गुरमित चावला, निलेश देशभ्रतार, आशिष जुनघरे, सुधा बनाफर,कंुदा भास्कर, आरती पटले, वर्षा खोब्रागडे, आशा जैन, लक्ष्मी आंबेडारे, प्रज्ञा मेहता, आशा कुलसंुगे, निरंजना चिचखेडे, छाया बोरकर, तारिका गिरीपुंजे, सुरज सुखदेवे, डाॅ.निलेश बाजपेई, गिरधर वाघमारे,  जितेंद्र कडवे, शुभम मेश्राम, घनश्याम पारधी, आशिष पटले, रोहित सुखदेवे, सुनिता भालाधरे, नितेश मेश्राम,  स्नेहल बंसोड आदी शेकडो शिवाजी भक्त उपस्थित होते. उपस्थितांचे आभारप्रदर्शन सविता तुरकर यांनी मानले.