वेंगुर्ले-कुडाळ मुख्य रस्त्यावरील शॉर्टसर्किटमुळे आग लागून कार पेटली

0
20

वेंगुर्ले :-वेंगुर्ले- कुडाळ या मुख्य मार्गावरील मठ येथील पेट्रोल पंपानजिक 200 मिटर अंतरावर वेंगुर्ले खर्डेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक संजीव चमणकर यांच्या कारला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून कार जळून खाक झाली. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वेंगुर्ले येथील खर्डेकर महाविद्यालयातील प्राध्यापक संजीव चमणकर हे महविद्यालय सुटल्यानंतर ते वेंगुर्ले येथून वेतोरेच्या दिशेने घरी जात होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी गाडीमध्ये प्रवास करत होती. कार एम एच 07 क्यू 0079 मठ टाकयेवाडी येथे आली असता त्या कारमधून धूर येण्यास सुरुवात झाली. तात्काळ चमणकर यांनी पत्नीसह बाहेर येऊन पाहिले असता धूर वाढला आणि गाडीने पेट घेतला. या दुर्घटनेबाबत तात्काळ स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळविले तसेच वेंगुर्ले नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाला पोलीसांनी पाचारण केले. बंब काही कालावधीत घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी आग विझवली, मात्र तोपर्यंत कारचे पूर्ण जळून मोठे नुकसान झाले आहे.

तर आग विझवण्यासाठी वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस अंमलदार मनोज परुळेकर,मठ येथील उपसरपंच निलेश नाईक,संतोष तेंडुलकर,पिटया नाईक,उमेश गावडे,प्रसन्ना शेणवी,शिवसेना उपतालूका प्रमुख उमेश नाईक,होमगार्ड पांडुरंग मठकर होमगार्ड तुषार मांजरेकर,अरविंद बागायतकर सुहास तेंडोलकर,समीर नाईक,नितीश कांबळी, युवराज ठाकुर,प्रकाश गडेकर,दादा मोबारकर,सुहास कांबळी तसेच वेंगुर्ले नगरपरिषदेचे भाऊ कुबल,बाबुराव जाधव,राहुल आरेकर व पेट्रोल पंपावरील कर्मचारी आदी मठ येथील स्थानिकांनी मदत कार्यात सहभाग घेतला.तर या आगीची भीषणता येवढी होती की,त्या आगीच्या काळया धुराचे लोण तीन ते चार किलोमीटरच्या परिश्रेत्रात सहज दृष्टित पडत होते.असे तेथील ग्रामस्थांनी सांगितले.,