शिंदे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका;राज्यपालही अडचणीत

0
93

नवी दिल्ली – एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयात आहे. काल मंगळवारी सर्वोच्च न्यायालयातून शिंदे गटाला काहीसा दिलासाही मिळाला होता. त्यामुळे शिंदे गटात आनंदाचं वातावरण होतं.मात्र मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्दावरून एकनाथ शिंदे गटाला धक्का दिला आहे. तसेच राज्यपालही यातून अडचणीत येण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकराने राज्यपाल नियुक्तीसाठी १२ आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. मात्र त्यावर राज्यपालांकडून दीड वर्ष काहीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. मात्र एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर नव्याने १२ आमदारांची नियुक्त करण्याचं नियोजन केले होते. मात्र या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. न्यायालयाच्या मनाईमुळे राज्यपालही अडचणीत आले असून त्यांना आमदारांच्या नियुक्त्या करता येणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे.

दरम्यान शिवसेना नेमकी कोणाची या वादावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत शिवसेना पक्ष आणि पक्षाचं चिन्ह याचा निर्णय घेण्याची मुभा सर्वोच्च न्यायलायाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिली आहे. त्यामुळे शिंदे गटाला हा मोठा दिलासा मानला जात आहे. तर ठाकरे गटाला हा धक्का मानला जात आहे. मात्र न्यायालयाने राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्दावर शिंदे सरकारला धक्का दिला आहे.