जंतर-मंतरवर एकवटल्‍या विद्यार्थी संघटना

0
11
वृत्तसंस्था
नवी दिल्‍ली दि.23 – हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणात न्याय मिळवण्‍यासाठी देशाच्या कानाकोप-यातून आलेल्‍या विद्यार्थी संघटना दिल्लीच्या जंतर-मंतरवर एकवटल्‍या आहेत. आंबेडकर भवनपासून जंतर-मंतरकडे विद्यार्थ्‍यांचा मोर्चा निघाला. भारिप बहुजन महासंघाचे नेते माजी खासदार प्रकाश आंबेडकर या मोर्चाचे नेतृत्व करीत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही विद्याथ्याच्या आंदोलनाला सहभागी होऊन पाठिंबा दिला आहे.जेएनयुआयचे विद्याथीर् मोठ्या सख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
काय म्‍हणाले प्रकाश आंबेडकर.. 
– प्रकाश आंबेडकर यांनी या मोर्चा संदर्भात माध्‍यमांशी संवाद साधतांना सांगितले की,  सरकारने आपलाच विद्यार्थी संघ वाढवण्याचा प्रयत्न करू नये. विद्यार्थ्‍यांना न्याय द्यावा, रोहित प्रकरणातील दोषींना शिक्षा मिळेल अशी अपेक्षा आहे.भगव्या संघटना सोडून मोर्चात सर्वच संघटना सहभागी झाल्या आहेत.
या आहेत आंदोलक विद्यार्थ्यांच्‍या मागण्‍या..
– दलित विद्यार्थी रोहित वेमुला आत्‍महत्‍या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी.
– रोहितच्‍या परिवाराला आर्थिक मदत करावी.
– रोहितच्‍या नावाने एक कायदा व्‍हावा, ज्‍यामध्‍ये कोणत्‍याही जाती, धर्माचा विचार न करता समान व्‍यवहार असावा.
– विविध मागण्‍यांसाठी विद्यार्थी घोषणा देत आहेत.