संसदेत चर्चा करा, गोंधळ नको – राष्ट्रपती

0
9
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि. २३ – संसदेमध्ये लोकशाही मार्गाने चर्चा करा, पण गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखू नका असा सल्ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिला.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाने आज मंगळवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली.
संसदेमध्ये राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या संयुक्त सत्राला संबोधित केले. राष्ट्रपतींनी सर्व खासदारांना परस्परांना सहकार्य करुन आपआपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले. संसदेचे कामकाज सुरळीत चालू रहाण्यासाठी सरकारही प्रयत्नशील राहील असे त्यांनी सांगितले.
या अधिवेशनात सरकार राज्यसभेत प्रलंबित असलेली१२ आणि लोकसभेत प्रलंबित असलेले एक विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न करेल. उच्च शिक्षण संस्था, जेएनयू आणि हैदराबाद विद्यापीठ यावर उद्या चर्चा होणार आहे.
राष्टपतींनी मांडलेले काही महत्वाचे मुद्दे
  • ग्रामीण विकासाला आमचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे.
  • “पर ड्रॉप, मोअर क्रॉप‘ या तत्त्वासाठी सरकार कटिबद्ध आहे.
  • माझ्या सरकारने तीन नव्या सामाजिक आणि निवृत्तीवेतनाच्या योजना अंमलात आणल्या आहेत.
  • ‘सर्वांसाठी घर‘ देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.
  • ‘मेक इन इंडिया‘ उपक्रमामुळे परदेशी थेट गुंतवणुकीमध्ये (एफडीआय) 39 टक्के वाढ झाली आहे.
  • 2015 मध्ये युरियाचे सर्वांत जास्त उत्पादन झाले आहे.
  • माझ्या सरकारने आश्‍वासन दिल्याप्रमाणे “वन रॅंक, वन पेन्शन‘ ही गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेली योजना प्रत्यक्षात साकारली.
  • माझे सरकार “सबका विकास‘ वर लक्ष केंद्रित करत आहे.
  • शेजारी देशांचे कल्याण व्हावे हा विचार माझे सरकार करते.
  • दहशतवादाचा जगाला धोका आहे. जगातून दहशतवाद हटविण्यासाठी जगाने सक्षम प्रयत्न करणे गरजेचे आहे.
  • आपण संपूर्ण जगात पोहोचलो आहोत.
  • सक्षम परराष्ट्र धोरण राबविण्यासाठी माझे सरकार सतत प्रयत्नशील आहे.