मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्याकडून महिला अधिकाऱ्याचा विनयभंग

0
24

मुंबई- मंत्रालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. मंत्रालयाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यानं संबंधित विभागात काम करणाऱ्या उपसंचालक दर्जाच्या महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केला आहे. आरोपी अधिकाऱ्याने “मला कंटाळा आलाय माझ्यासाठी गाणं म्हणून दाखव” अशी मागणी पीडित महिला अधिकाऱ्याकडे केली आहे. हा सर्व प्रकार आरोपी अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये घडला असून यावेळी विभागाचे उपसचिवही कॅबिनमध्ये उपस्थित होते.

या प्रकारानंतर पीडित महिला अधिकाऱ्याने संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. विधिमंडळाच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एका व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला उपसंचालक दर्जाच्या पदावर काम करतात. १८ ऑक्टोबर रोजी संबंधित विभागातील अवर सचिव स्तरावरील पुरुष अधिकाऱ्याने पीडित महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केला. “मला बरं वाटत नाही, मला कंटाळा आला आहे. माझ्यासाठी गाणं म्हणून दाखव,’ अशा प्रकारची मागणी आरोपीनं केली आहे.