RBI ने लाँच केली डिजिटल करेंसी:यापुढे रोख रकम बाळगण्याची काहीच गरज नाही, 9 बँकांसह ‘CBDC होलसेल’ची सुरुवात

0
85

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBIने मंगळवारी देशाच्या पहिल्या डिजिटल करेंसी अर्थात पहिल्या आभासी चलनाची सुरुवात केली. या प्रकरणी पथदर्शी प्रकल्प म्हणून केंद्रीय बँकेने डिजिटल करेंसी CBDC होलसेल जारी केली आहे. यासाठी SBI, बँक ऑफ बडोदा, यूनियन बँक ऑफ इंडिया, HDFC, ICICI, कोटक महिंद्रा, यस बैंक, IDFC फर्स्ट व HSBC बँकेची निवड करण्यात आली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारान यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करताना डिजिटल करेंसीची घोषणा केली होती.

2 प्रकारचे असेल डिजिटल चलन

डिजिटल चलन 2 प्रकारचे असेल – CBDC होलसेल व CBDC रिटेल. 1 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या डिजिटल चलन CBDC होलसेल आहे. त्याचा वापर बँक, मोठ्या नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या व इतर मोठे सौदे करणाऱ्या मोठ्या वित्तीय संस्थांना करता येईल. त्यानंतर CBDC रिटेल जारी होईल. त्याचा वापर सर्वसामान्य जनतेला दैनंदिन व्यवहारासाठी करता येईल.

e₹ चे मूल्य विद्यमान चलनासारखेच असेल

e₹ म्हणजे डिजिटल चलनाचे मूल्य विद्यमान चलनासारखेच असेल. तेही फिजिकल करेंसीसारखे मान्य केले जाईल. e₹ मुळे खिशात रोकड ठेवण्याची गरज पडणार नाही. ते मोबाइल वॉलेटसारखेच काम करेल. ते जमा करण्यासाठी बँक खाते असण्याचीही गरज नाही. पण त्यामुळे कॅशलेस पेमेंट करता येईल. अज्ञात व्यक्तीला माहिती शेअर करण्याचीही गरज भासणार नाही. गोपनीयता पाळली जाईल. या प्रकरणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रोख रकमेवरील अलंबित्व कमी होईल. नोटा छापण्याचा खर्चही कमी होईल.

चला तर मग जाणून घेऊया CBDC म्हणजे काय? सरकारला त्याची गरज का वाटली? सर्वसामान्य जनतेसाठी ती किती सुरक्षित व फायद्याची आहे?

प्रश्न : डिजिटल चलन CBDC कोण लॉन्च करेल?

उत्तर : RBI, जाणून घ्या कशी होणार लॉन्चिंग….

  • रिजर्व बँक ऑफ इंडिया, म्हणजे RBI नव्या आर्थिक वर्षात CBDC लाँच करेल. नवे चलन ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित होईल.
  • RBI च्यावतीने डिजिटल स्वरुपात जारी करण्यात आलेले CBDC एक लीगल टेंडर असेल. CBDC मध्यवर्ती बँकेकडून जारी होणाऱ्या चलनासारखेच असेल. पण ते नोटेसारखे तुम्हाला खिशात बाळगता येणार नाही.
  • हे चलनासारखेच काम करेल. ते CBDC नोटेसोबत बदलताही येईल. ते इलेक्ट्रॉनिक स्वरुपात तुमच्या खात्यात दिसून येईल.
  • RBI च्या अहवालात यापूर्वीच CBDC द्वारे तुम्हाला कुठेही सुलभ व सुरक्षितपणे व्यवहार करता येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रश्न : हे क्रिप्टोकरेंसी सारखे आहे काय?

उत्तर : नाही, मग कशी असेल, जाणून घेऊया…

  • CBDC क्रिप्टोकरेंसी नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेचे CBDC एक लीगल टेंडर असेल.
  • ते RBI जारी करेल. त्यामुळे त्यात जोखिम असणार नाही. यामुळे देसात कुठेही सहजपणे व्यवहार करता येईल.
  • हे प्रायव्हेट व्हर्च्युअल करेंसी बिटकॉइनहून एकदम वेगळे असेल.
  • प्रायव्हेट व्हर्च्युअल करेंसीविषयी अनेक समस्या असतात. या आभासी चलनांना अद्याप कोणत्याही देशाने मान्यता दिली नाही.
  • खासगी आभासी चलनाला अद्याप कोणत्याही सरकारने मान्यता न दिल्यामुळे ते बाळगण्याची जोखिमही सर्वाधिक असते.
  • प्रायव्हेट व्हर्चुअल करेंसी कमोटीडी नाही. तसेच त्यांचे कोणते अंतर्गत मूल्यही नसते.

प्रश्न : ही बिटकॉइनसारखीच रिस्की करेंसी असेल काय?

प्रश्न : नाही, जाणून घ्या CBDC किती सुरक्षित आहे.

इन्व्हेस्टोपीडियाच्या रिपोर्टनुसार, सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये यासाठी सरकारचे लक्ष्य त्यांना एक वैध व सुविधाजनक डिजिटल करेंसी उपलब्ध करवून देण्याचे आहे.

सरकारच्या अर्थसंकल्पात डिजिटल चलनाची घोषणा करण्यात आल्यामुळे बिटकॉइन व इथर सारख्या अन्य क्रिप्टो व व्हर्च्युअल करेंसीविषयी शंका व्यक्त केली जात आहे. RBIने अनेकदा बिटकॉइनवर चिंता व्यक्त केली आहे. कारण, बिटकॉइन, इथर सारख्या क्रिप्टोकरंसीमुळे मनी लाँड्रिंग, टेरर फंडिंग, कर चोरी सारखे विविध धोके निर्माण होतात.

या चलनांचा वापर अतिरेकी संघटनाही करू शकतात. त्यामुळे आरबीआयने स्वतःचे आभासी चलन CBDC आणण्याची घोषणा केली आहे.

प्रश्न : CBDC इतर डिजिटल पेमेंट्सहून चांगले आहे काय?

जवाब : हो, कसे पाहा…

समजा तुम्ही एका UPI प्रणालीद्वारे आपल्या बँक खात्याऐवजी CBDC ने व्यवहार केला. त्यात कॅश हँड ओव्हर करताना इंटरबँक सेटलमेंटची गरज भासत नाही. यामुळे पेमेंट्स सिस्टमने व्यवहार अधिक रियल टाइममध्ये व कमी खर्चात होईल. यामुळे भारतीय आयातदार कोणत्याही मध्यस्थांशिवाय अमेरिकन निर्यातदारांना रियल टाइममध्ये डिजिटल डॉलर्स देता येतील.

प्रश्न : CBDC चा इतर बँकांवर परिणाम होईल?

उत्तर : हो, जाणून घ्या कसा पडेल परिणाम…

CBDC मुळे बँकेत रोकड जमा करण्याचा व्यवहार कमी होईल. तसेच सेटलमेंट रिस्कही कमी होईल. रिस्क फ्री असल्यामुळे CBDC बँक डिपॉझिट कमी करेल. तसेच जमा रकमेवरील सरकारी गॅरंटीतही कपात करेल. दुसरीकडे, बँकेने जमा रकम गमावली, तर क्रेडिट तयार करण्याची तिची क्षमता मर्यादित होईल. कारण, केंद्रीय बँक खासगी क्षेत्राला कर्ज प्रदान करू शकत नाहीत.

डिजिटल करेंसी सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरेल?

डिजिटल चलनामुळे सरकारसह सर्वसामान्य जनता व उद्योगांना व्यवहारांवर येणारा खर्च कमी होईल. उदाहरणार्थ, UAE मधील एका वर्करला वेतनाचा 50% भाग डिजिटल स्वरुपात मिळतो. यामुळे त्यांना इतर देशांतील आपल्या नातेवाइकांना सहजपणे कोणतेही शुल्क न देता पैसे पाठवता येतात.

जागतिक बँकेच्या अंदाजानुसार, अशा प्रकारे दुसऱ्या देशांत पैसे पाठवण्यासाठी 7%हून अधिक शुल्क द्यावे लागते. डिजिटल चलनामुळे हा खर्च 2% पर्यंत कमी होईल. यामुळे कमी उत्पन्न असणआऱ्या देशांना वार्षिक 16 अब्ज डॉलर्सहून (1.2 लाख कोटी रुपये) अधिक पैसे मिळतील.