पुण्यात 18 देशांचा संयुक्त लष्करी युद्ध सराव सुरु

0
14

पुणे- आग्नेय आशियातील देशांसह रशिया, चीन, जपानसह अमेरिकासारख्या देशाचे लष्करी जवानांच्या पथकांचा बहुराष्ट्रीय युद्ध सरावाला आजपासून सुरुवात झाली. 2 ते 8 मार्च या दरम्यान औंध लष्करी तळ आणि लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय (सीएमई) येथे या सरावाला सुरुवात झाली. एवढ्या मोठ्या स्तरावर पुण्यात पहिल्यांदाच विविध देशांचा संयुक्त युद्ध सराव होत आहे. या संयुक्त सरावाला ‘एक्सरसाइज फोर्स 18’ असे नाव देण्यात आले आहे.

या संयुक्त युद्ध सरावात भारत, ब्रुनोई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, चीन, रशिया, जपानसह अमेरिका देश सहभागी झाले आहेत. भारतीय लष्करातील ब्रिगेडिअर अशोक नरूला यांच्या नेतृत्वाखाली एक टीम या युद्ध सरावात सहभागी झाली आहे.