नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत बीएसएफचे २ जवान शहीद

0
9

वृत्तसंस्था

रायपूर, दि. १२ – छत्तीसगडच्या कान्केर जिल्ह्यात शनिवारी सकाळी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत बीएसएफचे (सीमा सुरक्षा दल) २ जवान शहीद झाले असून ४ जण जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, कन्केर जिल्ह्यातील बेचा गावाजवळील जंगलात नक्षलवादी लपल्याची माहिती मिळताच बीएसएफच्या जवान शोधमोहिम सुरू केली असता, नक्षलवाद्यांनी गोळीबार करत हल्ला चढवला. त्यात २ जवान शहीद झाले तर ४ जण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारांसाठी रायपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले.