ना.बडोले केली राका येथील बोरवेलची पाहणी

0
12

सडक अर्जुनी (गोंदिया)- शेळ्या चारायला आजीसह गेलेला असताना रामकृष्ण चांदेवार (रा. राका पळसगाव)  यांच्या शेतातील बोअरवेलमध्ये 283 फूट खड्ड्यात पडलेल्या विवेक दोनोडेचा मृत्यू झाला , अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी  शुक्रवारला दिली. विवेकला वाचविण्यासाठी गेले दोन दिवस चाललेले प्रयत्न अपयशी ठरले.आज शनिवारला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री रा.सु.बडोले यांनी राका गावाला दुपारी भेट दिली.तसेच त्यांनी घटनास्थळी जाऊन ज्या बोरवेलमध्ये विवेक पडला.त्या बोरवेलची पाहणी केली. तसेच रामकृष्ण चांदेवार या बोरमालकाविरुध्द गुन्हा नोंदविण्यासंबधी कायदेशीर प्रकियेला सुरवात करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ.विजय सुर्यंवशी यांनी दिली आहे.यावेळी जिल्हाधिकारी सुर्यवंशी,पोलिस अधिक्षक शशीकुमार मीणा,उपविभागीय अधिकारी,तहसिलदार,माजी आमदार दयाराम कापगते,भाजप जिल्हाध्यक्ष व माजी आमदार हेमंत पटले,सभापती कविता रंगारी,जि.प.सदस्य माधुरी पाथोडे, नागपूर महानगरपालिकेचे नियंत्रण पथक, पुणे येथील एनईएसएच पथक,बालाघाट येथील खनीकर्म अधिकारी आदी उपस्थित होते.