होडरीच्या जंगलातून नक्षल्यांचे भूसुरुंग निकामी

0
7

गडचिरोली, :घातपात करण्याच्या हेतूने नक्षल्यांनी होडरी येथील नाल्यावर पेरुन ठेवलेला भूसुरुंग पोलिसांनी शिताफीने काढून निकामी केला.३१ मार्च रोजी भामरागड तालुक्यातील लाहेरी उपपोलिस ठाण्याच्या हद्दीतील होडरी येथील जंगलात जिल्हा पोलिस व केंद्रीय राखीव दलाचे जवान संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. यावेळी त्यांना नाल्यावर भूसुरुंग पेरुन ठेवले असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ते बाहेर काढून निकामी केले. जप्त केलेल्या साहित्यात ६ किलो वजनाचा एक क्लेमोर माईन, एक डिटोनेटर, ४०० ग्रॅम बारुद, स्प्लिंटर, ७० मीटर वायर, १० बॅटऱ्या इत्यादी साहित्याचा समावेश आहे