आमदार गोपाल अग्रवालांना भाजप नगरसेवकाची मारहाण

0
9

IMG-20160409-WA0092[1]गोंदिया, दि. ९ : महाराष्ट्र राज्य विधानसभा लोकलेखा समितीचे अध्यक्ष व गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर आज, शनिवारी(ता.९) सायंकाळी भाजपचे स्वीकृत पालिका नगरसेवकाने सात वाजताच्या सुमारास जीवघेणा हल्ला केला. यात गोपालदास यांच्या नाक, डोळे आणि गालावर जखम झाली. तातडीने पोलिस अधीक्षक शशीकुमार मिणा यांनी घटनास्थळ गाठून मारहाण करणाèयाच्या शोधार्थ पथक रवाना केले.तसेच या घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांना भ्रमणध्वनीवर देण्यात आली.
मतदारसंघ आणि जिल्ह्याच्या विकासाकरिता किती निधी खेचून आणला. पुढील कोणत्या कामाचे नियोजन करायचे आहे. आणि कोणकोणते प्रकल्प प्रलंबित आहेत, यासंदर्भात गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा महाराष्ट्र राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांनी शहरातील होटल ग्रॅन्ड सीता येथे आज सायंकाळी सहा वाजता पत्रकार परिषद बोलावली होती. पत्रपरिषदेत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी माहिती दिली. पत्रपरिषदेचा शेवट होत असतानाच हॉटेलच्या बैठकरुम‘ध्ये गोंदिया पालिकेचे भाजपचे स्वीकृत सदस्य शीव शर्मा यांनी एका तरुणासह प्रवेश केला. काहीही न बोलता तो आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या जवळ गेला. गोपालदास अग्रवाल त्याला काय काम आहे, असे विचारत असतानाच शिव शर्मा आणि त्यांच्या सोबत असलेल्या तरुणाने गोपालदास अग्रवाल यांना मारहाण केली. गोपालदास अग्रवाल यांचा मुलगा विशाल अग्रवाल याला देखील मारहाण करुन त्याचे कपडे फाडले. त्यानंतर तो बाहेर पडला. यावेळी त्यांचा अंगरक्षक हॉटेलच्या बाहेर होता. या मारहाणीत गोपालदास अग्रवाल यांचा डोळा, नाक आणि गालावर जख‘ झाली. गोपालदास अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांचे कपडे देखील फाटले. याची माहिती तातडीने पोलिस अधीक्षक शशिकुमार मिणा यांना देण्यात आली. पोलिस अधीक्षक मिणा, उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास राठोड आणि रामनगर पोलिस ठाण्याचे  ठाणेदार बाळासाहेब पवार,शहरचे ठाणेदार शुक्ला घटनास्थळावर दाखल झाले. आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना करत असल्याचे ठाणेदार बाळासाहेब पवार यांनी सांगितले. वैद्यकीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात आमदार गोपालदास अग्रवाल यांना हलविण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात काँग्रेस कार्यकत्यार्ंनी एकच गर्दी करण्यास सुरवात केली असून बाजारात तणावाचे वातावरण निर्माण होऊन बाजार बंद होऊ लागले होते.आमदार गोपालदास अग्रवाल यांनी आपणास मारहणा करणारा शिव शर्मा असल्याचे पत्रकारांना सांगितले आपण नगरपरिषदेत चाललेल्या गैरप्रकाराचा नेहमीच विरोध करीत आल्याचेही ते म्हणाले.मात्र भाजपच्या काळात गुंडगर्दी मोठ्या प्रमाणात वाढली असून आता लोकप्रतिनिधी सुध्दा सुरक्षित नसल्याचे त्यांनी या घडलेल्या प्रकरणानंतर सांगितले.
मारहाण झाली तेव्हा गोपालदास अग्रवाल यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेढे, सभापती पी. जी. कटरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा कटरे, नगर पालिकेचे नगरसेवक राकेश ठाकूर उपस्थित होते.